रस्ता नसल्याने इगतपुरी मध्ये गर्भवतीची अधि पायपीट नतर दवाखान्यात उपचार सुरू होण्याच्या अगोदर मृत्यू.

नाशिक जनमत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जून वनेवाडी या आदिवासी वस्तीला जवळच्या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही त्यामुळे सात महिन्याची गर्भवती असलेल्या वनिता भाऊ भगत या महिलेला प्रसव वेदना होत असताना दवाखान्यात जाण्यासाठी मध्यरात्रीच रस्त्यावरून अडीच किलोमीटर स्वतः पायी चालावे लागले नंतर प्रसावेदना व तब्येत खराब झाल्याने कुटुंबीयांनी डोली करत रुग्णालय गाठले मात्र या काळात तीव्र वेदना झाल्यामुळे उपचार सुरू होण्या अगोदरच तिचे निधन झाले तिचा मृत्यूच्या अंत्यसंस्कारासाठी घरी नेता नाही पुन्हा डोलीने मृत्युंदेह न्यावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताप व्यक्त केला जात आहे. प्रगतशील महाराष्ट्राच्या इगतपुरीत ही घटना घडल्याने राजकीय मंडळी फक्त सत्तेसाठी आहेत का महाराष्ट्राच्या प्रगतीच्या गप्पा करणाऱ्या कुडाळशाहीला निरपराध नागरिकांचे जीव जात असले तरी अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न का केला जात नाही. अशी चर्चा जोर धरत आहे. लवकरात लवकर चांगल्या प्रतीचे रस्ते आदिवासी भागातील जनतेसाठी तयार झाले पाहिजे. असे आदिवासी नागरिकांचे म्हणणे आहे कोट्यावधी रुपयाचे विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागामध्ये व महाराष्ट्रामध्ये ही लाजिरवाणी घटना घड लीआहे.. ग्रामीण भागात बांधण्यात आलेले आरोग्य केंद्र येथील डॉक्टर नेहमी गैरहजर असतात तसेच संध्याकाळी सहा नंतर या दवाखान्यांना कुलपे लागतात. आता तरी राजकीय मंडळींनी जागे होऊन अशा घटना ताबडतोब थांबवल्या पाहिजे.