ब्रेकिंग
कावनई किल्ला घटनेत जिवित वा वित्तहानी नाही* *नागरिकांनी घाबरू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*कावनई किल्ला घटनेत जिवित वा वित्तहानी नाही*
*नागरिकांनी घाबरू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन*
नाशिक, दि. 21(जिमाका वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा वरील काही भाग कोसळला आहे. त्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. इगतपुरीचे तहसीलदार घटना स्थळावर पोहचले आहेत,
किल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणा-या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आपआपल्या तालुक्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.