क्रिडा व मनोरंजन

१५ ते १८ जून नाशिकमध्ये आठ सघात क्रिकेट सामने.

 

 

१५ ते १८ जून नाशिकमध्ये

 

 

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, एन डी सी ए प्रोफेशनल लीग २०२२-२३ चा थरार १५ ते १८ जून दरम्यान रंगणार आहे. नाशिकमधील ८ संघांत , एन डी सी ए च्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब व महात्मा नगर क्रिकेट मैदानावर सदर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पुढील आठ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत :

 

१ एव्हरशाईन ए बी

२ मराठा वॉरीअर्स

३ स्ट्राईकर्स

४ आर्किटेक्टस इलेवन

५ सनराइज

६ स्माशर्स

७ एव्हरशाईन विराट आणि

८ नाशिक कोचेस

या स्पर्धेत नाशिक मधील डॉक्टर्स ,आर्किटेक्टस, सीए, वकील ,बिल्डर्स ,इंजिनिअर्स ,उद्योजक , व्यावसायिक असे विविध प्रोफेशन मध्ये काम करणारे खेळाडू सहभागी होणार आहेत.

 

गुरुवार १५ जून रोजी सकाळी आठ वाजता , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर एव्हरशाईन ए बी विरुद्ध मराठा वॉरीअर्स तर महात्मा नगर क्रिकेट मैदानावर स्ट्राईकर्स विरुद्ध आर्किटेक्टस इलेवन असा या एन डी सी ए प्रोफेशनल लीग २०२२-२३ स्पर्धेचा शुभारंभ होत आहे.

 

सर्व क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर म्हणजे या स्पर्धेचे थेट – live – प्रक्षेपण स्पोर्टवोट, मुंबई तर्फे करण्यात येणार आहे. स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करून हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेता येईल . नुकत्याच संपन्न झालेल्या हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेद्वारे स्पोर्टवोटच्या थेट प्रक्षेपणाने सुवर्ण महोत्सवी वर्षात , एन डी सी ए चा ऐतिहासिक डिजिटल अध्याय सुरु झाला व हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेतला. तसाच या एन डी सी ए प्रोफेशनल लीग स्पर्धेचाही सर्वांनी आनंद घ्यावा असे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटने तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे