जिल्हा रूग्णालयात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांविषयी* *जनजागृती पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन*

*जिल्हा रूग्णालयात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांविषयी*
*जनजागृती पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन*
*नाशिक दि. 05 जून, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
जिल्हा रूग्णालयात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ व मद्यसेवानाचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती व्हावी, तसेच व्यसनाधीन व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 7 जून 2023 पर्यंत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी व रूग्णांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.
जिल्हा तंबाखु नियंत्रण कक्ष, जिल्हा रूग्णालय , हॅप्पी ह्युमन फाउंडेशन व निकोटीन ॲनानिमस यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यसनाधीन व्यक्तींच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच समस्याग्रस्त व्यक्तींसोबत या प्रदर्शनाच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर्स यांच्यामार्फत सुसंवाद साधण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी दिली आहे.