शिधापत्रिकेला आधार कार्ड तात्काळ लिंक करावे अन्यथा धान्य पुरवठा बंद– तहसीलदार डॉ. मोरे
शिधापत्रिकेला आधार कार्ड तात्काळ लिंक करावे अन्यथा धान्य पुरवठा बंद– तहसीलदार डॉ. मोरे
अरुण हिंगमिरे
पत्रकार जातेगांव
नांदगाव
नांदगाव चे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना आवाहन केले की,
शिधापत्रिकेला लाभार्थ्यांचे तत्काळ आधार लिंक करावे
अन्यथा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील शिधापत्रिकेला आधार संलग्न नसेल तर त्यांना दर महिन्याला मिळणारा शिधा मिळनार नाही तरी लाभार्थ्यांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत स्थानिक रेशन दुकानदारांकडे दिनांक २६ मे पर्यंत जमा करावी, असे आवाहन तहसलिदार डॉ.मोरे यांनी केले आहे.
याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यात अंत्योदय कार्डसंख्या ८२८४ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या १४१०१८ इतकी आहे. तालुक्यातील मंजूर लाभार्थ्यापैकी ९७.२८ टक्के लाभार्थ्यांची आधार सिडींग, ऑनलाईन डाटा एन्ट्री करण्यात आली असुन, २.७२ टक्के आधार सिडींग बाकी आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी २६ मे पर्यंत आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड व रेशन कार्डची छायांकित प्रत स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करावी. अन्यथा संबंधितांना धान्याचा लाभ मिळणार नाही. शिवाय रेशन कार्डदेखील रद्द होऊ शकते. कुटुंबातील मयत झालेली व्यक्ती, अथवा विवाहीत मुलीचे नाव कमी करण्यासाठी रेशन दुकानदाराकडे तसा दाखला जमा करून ३१ मे पर्यंत स्वतः हून नाव कमी करून घ्यावे.
- माहे मे २०२३ मध्ये नियमित अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी कार्डधारकांनी किमान एका सदस्याचा भ्रमणध्वनी क्रमांक पॉस मशीनवर थंब देऊन नोंद करावी. एप्रिल २०२३ मध्ये ज्या लाभार्थ्यांनी आनंदाचा शिधा घेतलेला नाही, त्यांनी तो शंभर रुपये शुल्क भरुन तीन दिवसांच्या आत प्राप्त करुन घ्यावा. केशरी कार्डधारकांना शासनाकडून धान्य उपलब्ध नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना रेशन दुकानदाराकडे धान्य मागणीचा तगादा लावू नये, असेही तहसिलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांनी म्हटले आहे.
” तसेच ज्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अशा शिधापत्रिकाधारकांनी स्वतःहुन अन्न धान्याच्या 4 योजनेतून बाहेर पडा’ या योजनेत सहभाग घ्यावा. शिवाय मोफत धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारांकडे धान्याऐवजी पैशाची मागणी केल्यास याबाबत पुरवठा विभागाकडे तक्रार करावी. लाभार्थ्याची कुठलीही तक्रार येणार नाही याची काळजी रेशन दुकानदार यांनी घ्यावी.”
असे तहसिलदार डॉ. सिध्दार्थ ज. मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.