लोहशिंगवे येथे महाविद्यालयात पार पडला 35 वर्षांपूर्वील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात.
नाशिक जनमत ” जिल्हा परिषद शाळा लोहशिंगवे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे सात एप्रिल 2023 रोजी माजी विद्यार्थी पालक शैक्षणिक मेळावा खूप उत्साहात व आनंदात पार पडला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील माजी विद्यार्थी माजी प्राचार्य शिवाजी काकड सर, तसेच शाळेचे पहिले विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 84 नामदेव सखाराम हेंबाडे विशेष म्हणजे 1947 ध्वजारोहजन ध्वजारोहण सोहळ्या चे ते एकमेव साक्षीदार आज आपल्या हजर होते याचा गावाला खूप आनंद झाला, या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी काकड सर, व ज्येष्ठ नागरिक नामदेव सखाराम हेंबाडे यांच्या हस्ते सरस्वती मातेची पूजा व हार घालून नारळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले, या कार्यक्रमासाठी गावातील अनेक आजी-माजी विद्यार्थी हजर होते या या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फेटा बांधून फटाके वाजून ढोल वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले, या कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाने आपापल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला, त्यामध्ये एकत्र बसून खाल्लेले डबे निकालाच्या दिवशी मनात असलेली भीती बोर्डाच्या परीक्षेची भीती गुरुजींच्या हातावर खाल्लेल्या छड्या मैदानावर खेळलेली खो-खो कबड्डी यांचे डाव अशा गोड आठवणींना उजाळा दिला, त्यामध्ये शाळेचे पहिले विद्यार्थी नामदेव सखाराम हेंबाडे यांनी सांगितलेल्या जुन्या शाळेच्या आठवणी व 1947 सालातील झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या आठवणी मुळे प्रत्येकाला गहिवरून आले होते, तसेच विशेष आनंदाची बातमी म्हणजे जिल्हा परिषद शाळा लोहशिंगवे या शाळेला पंतप्रधान योजनेअंतर्गत साडेचौदा लाख रुपयांची प्रयोगशाळा मंजूर झालेली आहे, तसेच या शाळेसाठी याच गावातील माजी विद्यार्थी मांगीलाल जाधव सर विशेष परिश्रम घेतात त्यांना मोलाची साथ चौधरी सर व त्यांचा स्टाफ यासाठी अतिशय मेहनतीने सहकार्य करतात शाळेमध्ये अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम विशेष करून अभ्यासाकडे व खेळाकडे सुद्धा लक्ष दिले जाते अनेक विद्यार्थी तालुका व जिल्हा पातळीवर या शाळेचे घडलेले आहेत, या मेळाव्यासाठी बाहेरगावी असलेले नोकरी धंद्या निमित्त नाशिक पुणे मुंबई या ठिकाणाहून अनेक विद्यार्थी हजर झालेले होते त्यामध्ये नाशिक वरून दिलीप नामदेव हेंबाडे, साहेबराव विठ्ठल हेंबाडे, पोलीस शांताराम घुगे दीपक हेंबाडे
वाल्मीक हेंबाडे ज्ञानेश्वर हेंबाडे पुण्यावरून सुनील आप्पा , अमोल बापूसाहेब हेंबाडे तसेच नाशिक ब्लड बँकेचे संचालक देविदास साहेबराव हेंबाडे हे उपस्थित होते, तसेच गावातील भरत काकड सर, उपसरपंच शंकर हेंबाडे दिलीप आप्पा दिलीप काकड श्रावण हेंबाडे जनार्दन हेंबाडे असे अनेक आजी माजी विद्यार्थी हजर होते, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांगीलाल जाधव सर चौधरी सर तसेच शाळेतील सर्व स्टाफ अध्यक्ष सचिव सदस्य शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले, त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला माझी विद्यार्थी व पालक शेक्षणिक मेळावा.आयोजित केल्यामुळे z.p.शाळेतील सर्व आदरणीय शिक्षकांचे मनपूर्वक सर्व
माझी विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांचे खूप खूप आभार मानले जुन्या आठवणींना यानिमित्त उजाळा मिळाला. अशा प्रकारचे कार्यक्रम अनेक शाळेमध्ये आता होऊ लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.