नाशिकच्या अंबड परिसरातील चुंचाळे परिसरात बावीस वर्ष महिलेचा खून.
नाशिक जनमत प्रतिनिधी . नाशिक शेहारातील अंबड एमआयडीसी परिसरात जवळ असलेल्या चुंचाळे येथे काल रात्री एका महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न होत आहे तिच्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याचे समजते तिचा पती हा पेंटिंगचा व्यवसाय करतो म्हणून पाच दिवसापूर्वी औरंगाबाद येथून नाशिकचा चुंचाळे येथे राहण्यास आला होता अशी माहिती त्याने घरमालकास दिली असल्याचे समजते दरम्यान काल रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद येथील वाळूज पोलीस स्टेशन तर्फे नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशन मध्ये तशी माहिती देण्यात आली यानंतर अंबड पोलिसांतर्फे चुंचाळे परिसरात तपास केला असता एका घरामध्ये एका महिलेचा मृत्यू देह मिळून आला. सदर महिलेच्या गळ्यावर तीष्ण हत्याराने वार करून गळा कापण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदर महिलेचे नाव संगीता सचिन पवार वय 22 वर्षे असे आहे. दरम्यान पतीने पोलीस स्टेशन मध्येऔरंगाबादयेथे ही माहिती पोलिसांना दिली स्वतःहून केला असल्याचे पोलिसांना सांगितले आहे दरम्यान हा खून का झाला कशासाठी झाला त्याचा तपास अंबड पोलिस करत आहे दरम्यान या घटनेने थांबलेली खु णाची मालिका पुन्हा चालू झाल्याचे दिसून आल्याने नागरिकांमध्ये घबराट चे वातावरण आहे पोलिसांतर्फे रात्रीची गस्त पुन्हा वाढावी अशी मागणी होत आहे.