ब्रेकिंग
सप्तशृंगी मंदिर राहणार 45 दिवस बंद. मंदिर प्रशासनाचा निर्णय.
नाशिक जनमत वनी येथील सप्तशृंगी गडावरील मंदिर 45 दिवस पुढील काळात बंद राहणार आहे गडावरील तसेच देवीच्या सजावटी व इतर कामासाठी मंदिर प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान भाविकांसाठी पहिल्या पायरीवर भाविक नसमस्तक होऊ शकतील. या ठिकाणी सप्तशृंगी मातेची प्रतिमा बसवण्यात येणार असून या ठिकाणी दर्शन भाविक घेऊ शकतात. तसेच भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून इतर ज्या सुख सोयी आहेत त्या सर्व चालू आहे भक्तनिवास लॉन्स व इतर सुविधा मंदिर प्रशासनातर्फे जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे अशी माहिती मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. पुरातन विभागाने मूर्तीच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.