जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात* *अशासकीय लिपिक नि टंकलेखक पदाची भरती*
*जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात*
*अशासकीय लिपिक नि टंकलेखक पदाची भरती*
*नाशिक, दिनांक 16 डिसेंबर, 2022 (जि.मा.का. वृत्तसेवा):*
नाशिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपिक नि टंकलेखक पद भरावयाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी 28 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्पनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.
अशासकीय लिपिक नि टंकलेखक पदासाठी सशस्त्र दलात किमान 15 वर्षे सेवा झालेली असावी. मराठी टंलेखनाचा वेग दर मिनिटास 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असावे तसेच महाराष्ट्र शासनाची MS CIT प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इच्छुक माजी सैनिकांनी अर्जासोबत माजी सैनिक ओळखपत्र, मराठी टंकलेखन प्रमाणपत्र, संगणकाचे एम.एस.सी.आय.टी प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहेत. परिपूर्ण अर्ज 28 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,नाशिक येथे सादर करावेत, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्पनंट कमांडर ओंकार कापले यांनी कळविले आहे.
0000000000