जनभागीदारीतील अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या पर्यावरण पूरक विकासाचा आराखडाच होय* –*प्रदीप पेशकार*

*जनभागीदारीतील अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या पर्यावरण पूरक विकासाचा आराखडाच होय* –*प्रदीप पेशकार*
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प
‘पंचामृत’ ध्येय युक्त असलेला अर्थसंकल्प खरोखर जनभागीदारीतून तयार झाला.
1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास.
3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5) पर्यावरणपूरक विकास
खर्या अर्थाने अंत्योदयाचा विचार घेऊन केलेला अर्थसंकल्प.
समाजातील सर्व घटकांना म्हणजे महिला,युवा,शेतकरी, असंघटित कामगार,सर्व क्षेत्रातील कष्टकरी तसेच सर्व विविध जाती व समाजाच्या अपेक्षा लक्षात घेऊन केलेला संकल्प खरोखर सर्वस्पर्शी असा म्हणता येईल.
अनेक धार्मिक क्षेत्रातील विकास योजने बरोबर विविध संतांच्या स्मारकांच्या विकासाची आखणी हि जनभावनेचा केलेला आदर म्हणता येईल.
शिक्षण, आरोग्य,पर्यटन,स्वयंरोजगार यांना विशेष निधी तर व्यापारी व उद्योगांना वस्तू व सेवाकर शास्ती अभय योजना दिलासा दायक आहे.
एकंदरीत हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या पर्यावरण पुरक विकासाचा आराखडाच होय.