आरोग्य व शिक्षण

चांदवड येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने अकरा जण गंभीर जखमी..

नाशिक जनमत. समाधान सोमासे चांदवड तालुक्यातील दूर उधवळ परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरातील दहा ते बारा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान या घटनेने या परिसरामध्ये दहशत निर्माण झालेले आहे तालुक्यातील ऊधवल येथे देवरगाव दरसवाडी बाजूकडून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या तसेच रस्त्याने जाणाऱ्या लहान बालके व नागरिकांच्या हातापायाला तोंडाला चावा घेतला सुसाट सुटल्याने पिसाळलेल्या कुत्र्यानेचांगलाच धुमाकूळ घातला अचानक झालेल्या प्रकाराने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते अनेक जण रस्त्याने काही कामानिमित्त बाहेर जात होते यावेळी अचानक आलेल्या या कुत्र्याने  संजय कारभारी नवले अरुण विष्णू नवले हर्षदा संदीप नवले सार्थक रमेश ठाकरे गोकुळ अशोक पवार सुदर्शन संजय ठाकरे तसेच सुनील सुखदेव बडे सचिन गवळी इत्यादी जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले दरम्यान सर्व जखमींना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे मात्र तेथे कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लस उपलब्ध नसल्याने जखमींना वेळेत उपचार मिळण्याची गरज निर्माण झाली आहे दरम्यान नातलगांनी  यावेळेस डॉक्टरांना विचारणा करण्यात आली दरम्यान चार पाच तासानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास मालेगाव येथून लस उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांना ही लस देण्यात आली पुढील उपचारासाठी मालेगाव नाशिक येथे रुग्णांना पाठवण्यात आलेले आहे दरम्यान या घटनेने उधल व परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर पिसाळलेल्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या कुत्र्यास पकडण्याचा तसेच मारण्याचा प्रयत्न केल्याचे समजते मात्र हा प्रकार घातक असल्याचे नागरिकांनी सांगितले शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे शहरी भागातून ही कुत्रे ग्रामीण भागात सोडले जात असल्याचे बोलल्या जात आहे .कुत्र्यांची वाढलेली संख्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील आता डोकेदुखी ठरत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे