सोमेश्वर धबधब्यावर दोन जण बुडाले .रात्री उशिरापर्यंत शोध कार्य चालू. पोलीस बंदोबस्त ठेवण्याची नागरिकांची मागणी.
नाशिक जनमत सध्या गंगापूर धरणातून पाणी सोडले आहे त्यातच उन्हाचा पारा देखील चढलेला आहे. दरम्यान नागरिक व युवक थंडावा मिळवण्यासाठी व पर्यटन करण्यासाठी सोमेश्वर नवशा गणपती रामकुंड गोदावरी किनारा इत्यादी ठिकाणी जाऊन थंडावा व पाण्यात पोहण्याच्या आनंद घेत आहे परंतु अनेकांना पोहता येत नाही त्यामुळे जीव गमवावा लागत आहे . काल सोमेश्वर धबधबा बघण्यासाठी आलेले दोन मित्र गोदा वरी मध्ये बुडाल्याची भीती आहे मंगळवारी दिनांक एक वाजता दुपारी हा प्रकार घडला गंगापूर पोलीस आणि अग्निशामक दलाच्या वतीने शोधकार्य सुरू आहे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने शोध कार्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे आकाश पाचोरी व महेंद्र मेहरे असे बुडालेले दोघांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की घडलेलीआर्टलेटी सेंटर जवळ राहणारे चार मित्र सोमेश्वर येथे आले होते ऊन अधिक असल्याने अनेक जण धबधब्याच्याच्या खाली उतरून नदी पात्रात आंघोळ करत होते या चौघा मित्रांना आंघोळीचामोह झाला व ते नदीपात्रात उत्तरले मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने आकाश पाण्यासोबत वाहत जात असताना महेंद्र यांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला
परंतु दोघांनाही पाण्याचा प्रवाह दोघांनाही वाहून घेऊन गेला तर तरुणांनी आरडाओरड केल्याने स्थानिक रक्षकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र पाण्यामध्ये हे दोघेही दिसेनासे झाले घटनास्थळावर पोलीस व अग्निशामक दलाचे जवान आले होते अग्निशामक दलाच्या जवानांना तर्फे शोध कार्य चालू होते युवकांच्या घरी हा प्रकार समजल्याने सर्व कुटुंब शोकाकुल झालेला आहे सोमेश्वर घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी गंगापूर पोलीस ठाणे तर्फे दोन पोलीस कायमस्वरूपी दिवसा ठेवणे महत्त्वाचे झाले आहे अशी मागणी नागरिक करत आहे.