नववर्षाचे नवशा गणपतीचे दर्शन घेऊन केले भाविकांनी स्वागत.
नाशिक जनमत. प्रतिनिधी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अनेक नाशिककरांनी नवशा गणपतीचे दर्शन घेऊन केली गंगापूर रोडवरील नवशा गणपती येथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती दर्शनासाठी रांगात रांगा लागल्या होत्या. सकाळी पाच वाजेपासूनच भाविकांच्या सोयीसाठी मंदिर खुले करण्यात आले होते पहाटे सहा वाजेपासून मंदिर परिसरात गर्दी झाली होती दर्शन घेण्यास एक ते दीड तास लागत होता. दरम्यान अनेक भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे तसेच नाशिक येथील कपालेश्वर व तपोवन मधील स्वामीनारायण मंदिर. सेवन येथील सप्तशृंगी माता देवीचे दर्शन घेऊन भाविकांनी नववर्षाचे स्वागत केले नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत अनेक जण कुणी पार्टी
करतं तर कोणी देवदर्शन तर अनेक जण परिवारासह बाहेरगावी ट्रीपला जात असतात. काल पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तसेच पर्यटन स्थळे देखील फुल झाली होती दरम्यान थंडीचे प्रमाण वाढल्याने गुलाबी थंडीचा आनंद घेत भाविकांनी आनंद घेत नववर्ष साजरे केले नाशिक पुन्हा नाशिक मुंबई इत्यादी रोड गर्दीने फुलून गेले होते अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली होती.