महाराष्ट्र

रूपाली महाराज कीर्तनकार ते पीएसआय. सर्व क्षेत्रातून भरभरून अभिनंदन.

आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी जिद्द व चिकाटी असेल तर यश नक्कीच

नाशिक जनमत .प्रशांत काकड ठाणगाव यांच्याकडून सिन्नर तालुक्यातील दोडी येथील कीर्तनकार रूपाली शिवाजी केदार यांनी एमपीसी मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक च्यां परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहे कीर्तनकार पोलीस उपनिरीक्षक झाल्याने  त्याचेसर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे रूपाली केदार ही वारकरी कुटुंबातील आहे चुलते केदार नोकरीसाठी आळंदीला होते दरम्यान रुपाली ही आपल्या चुळत्या कडे आळंदी ला होती घरात धार्मिक वातावरण असल्याने तिने किर्तनाचे प्रशिक्षण घेतले आई वडिलांच्या इच्छेनुसार चौथीपासून आळंदीत अध्यात्म शिक्षणासोबत शाळा सुरू ठेवली काही काळ कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याकडे धडे गिरवले सातवी पासूनच बालकिर्तनकार म्हणून ओळख निर्माण झाली व इतर परिसरामध्ये अनेक कीर्तन रूपाली महाराज यांचे झाले होते दरम्यान 2017 मध्ये नितीन सानप यांचे तिचा विवाह झाला व पहिली पूर्वपरीक्षा दिली आणि प्रथमच नापास झाली परंतु खचून न जाता तिने आपला अभ्यास चालू ठेवला खाजगी कोचिंग क्लास लावला. एकीकडे कीर्तन चालू होते अभ्यासही सुरू होता किर्तन आणि अभ्यास करत परीक्षेची तयारी सुरू ठेवली परीक्षेसाठी पती नितीन यांनी तिला पाठिंबा दिला या जोरावर तिने 2019 मध्ये झालेल्या पूर्व आणि नंतर मुख्य परीक्षेत बाजी मारली मुलाखत दिली. आणि या बळावरच पीएसआय म्हणून निवड झाली .मुलाखतीमध्ये कीर्तनाच्या मोठा उपयोग झाला पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रात तून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जिद्द व चिकाटी असेल तर मनुष्य काही करू शकतो यशापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोचायचे असेल तर कष्ट व मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे हे रूपाली केदार यांच्या अनुभवातून तरुण पिढीने शिकण्यासारखे आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे