भाजप दिव्यांग विकास आघाडी. वसंतराव नाईक क्रांती सेना यांच्यातर्फे नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत समोर उपोषण.

नाशिक जनमत *भाजप दिव्याग विकास आघाडी* *वसंतराव नारायणराव **नाईक क्रांती सेना* *यांच्या विद्यमानाने नांदूर* *शिंगोटे तालुका सिन्नर* *ग्रामपंचायत समोर* *उपोषण करण्यात आले होते* दिव्यांगांना पाच टक्के निधी मिळण्याबाबत आज सकाळी नांदूर शिंगोटे गावातील सर्व दिव्यांग बांधव उपोषणाला बसले होते व या ठिकाणी पहारसंघटनेन जाहिर पाठिंबा दिला व संघर्ष ग्रुप गावातील सोसायटी चेअरमन एकविरा प्रतिष्ठान शिवसेना तालुकाप्रमुख या सर्व ज्येष्ठ मंडळींनी उपोषणाला पाठिंबा दिला याची दखल घेऊन ग्रामस्थ अधिकारी चिते साहेब व ग्रामसेवक सावकारी साहेब सरपंच गोपाळ
शेळके यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा होऊन दिव्यांग बांधवांच्या सर्व मागण्या मान्य केल्या व उपोषणाची सांगता करण्यात आली गावातील सरपंच शेळके साहेब यांनी बाळासाहेब घुगे यांना निंबू पाणी पाजून उपोषण सांगता झाली व आमच्या एकजुटीचा विजय झाला असे सर्व दिव्यांग बांधवांनी म्हटले आहे यावेळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ दरगुडे न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेचे खजीनदार सुनील सोनवणे विमा प्रतिनिधी प्रदीप केकाने प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे संदीप आव्हाड तालुका संघटकनारायण शेळके रमेश सानप भाऊ पाटील शेळके जयराम सानप शिवाजी शेळके सह गावातील सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते