महाराष्ट्र

नांदगाव येथे लोकमाता अहिल्यादेवी चे भव्य स्मारक निर्माण होईल .आमदार सुहास अण्णा कांदे

नांदगाव येथे लोकमाता अहिल्यादेवींचे भव्य स्मारक निर्माण होईल :~ आमदार सुहास आण्णा कांदे *

 

अरुण हिंगमीरे

नांदगाव नाशि

 

नांदगाव येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे प्रतिपादन  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नांदगाव येथे आयोजि

भव्य धनगर(मेंढपाळ)समाज निर्धार मेळाव्या प्रसंगी केले

याप्रसंगी लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी बोलतांना आमदार कांदे यांनी धनगर समाज बांधवांशी संवाद साधला या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना मला तुमचा भाऊ समजा, मुलगा समजा आणि आपल्या काहीही समस्या असतील तर सांगा

आपल्या मेहरबानी ने आमदार झालो आपल्या प्रत्येक सुख दुःखात नेहमी सोबत राहणार असुन आपल्या समाजातील मुलांना, मुलींना शिकवा धनगर समाजातील कोणत्याही बांधवाला सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय मदत अथवा इतर काहीही अडचण आली तर मला फोन करा, मला PA तालुक्यातील संकृती मोडीत काढायची आहे

आपले काही काम अडकले तर मध्यस्थी ची गरज नाही, तुम्ही मला आमदार केले आहे, म्हणून मलाच फोन करा तुमच्या समस्या मी त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास आ.कांदे यांनी दिला

तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शहरात पुतळा बसविण्याची मागणी जुनी असून, शासनस्तरावर रितसर परवानगी घेवून केवळ पुतळाच नव्हे तर अहिल्या देवी होळकर यांचे यथोचित स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार सुहास कांदे यांनी दिली

गंगाधरी येथे धनगर (मेंढपाळ) समाज निर्धार मेळाव्यात उपस्थितीत समस्त समाजबांधवांना दिला. तसेच समाज बांधवांना वन जमिन मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले

मेंढपाळ बांधवांचे धनगर समाजाच्या निर्धार मेळाव्यात आमदार कांदे यांनी शहरातील मध्यवर्ती भागात बसविण्यात येणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे तात्पुरत्या स्वरूपात अनावरण केले. या वेळी समस्त धनगर बांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार…’ अशा घोषणा दिल्या

धनगर समाज मेळाव्यातील उपस्थित मान्यवरांचे या वेळी धनगरी घोंगडी देवून स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना याप्रसंगी व्यासपीठावर मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, प्रमोद भाबड, किरण देवरे, अमोल नावंदर, मल्हार सेना महिला अध्यक्षा रंजना बोरसे, जिल्हाध्यक्ष राजेश शिंदे भगवान कोळेकर, रंगनाथ खरात, शिवाजी काटकर, प्रदिपराज भोंडे, गणेश शिंदे, राजेंद्र शिंदे, किरण देवरे, कारभारी शिंदे, माधवराव जाधव, गणेश गायकवाड, नंदू खरात, दिनकर खडांगळे आदी मान्यवरांसह सुमारे एक हजार धनगर समाज बांधव आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भगवान कोळेकर यांनी मानले.

मेळावा यशस्वितेसाठी रंगनाथ खरात भगवान कोळेकर, रंगनाथ खरात, शिवाजी काटकर, प्रदिपराज भोंडे, गणेश शिंदे, राजेंद्र शिंदे, किरण देवरे, कारभारी शिंदे, माधवराव जाधव व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे