देश-विदेश
ABB कंपनी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मनाजमेंत यांचे विद्यमाने उद्योग क्षेत्रातील बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयांवर चर्चा सत्र संपन्न*
- *ABB कंपनी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
पर्सनल मनाजमेंत यांचे विद्यमाने उद्योग क्षेत्रातील बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयांवर चर्चा सत्र संपन्न*
नाशिक: ABB कंपनी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मनाजमेंत यांचे विद्यमाने उद्योग क्षेत्रातील बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयांवर चर्चा सत्र संपन्न झाले असून या वेळी निपम चे अध्यक्ष प्रकाश बारी, सरचिटणीस हेमंत राख, निपम चे माजी अध्यक्ष उदय खरोटे ABB चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कोठावदे मनुष्यबळ विकास महाव्यवस्थापक दयानंद कुलकर्णी, आदींसह ABB चे व्यवस्थापकीय अधिकारी निपम पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील अग्रगण्य कंपनी असलेल्या ABB इंडिया कंपनीस आयजिविसी संस्थेकडून प्लॅटिनम अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.कंपनीने राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती कंपनीचे मुख्याधिकारी गणेश कोठावदे यांनी दिली. जागतिक पातळीवर झपाट्याने उद्योग बदल होत असतात त्या अनुषंगाने मनुष्यबळ विकास क्षेत्रातील कार्यपद्धती वर संभाव्य परिणाम व या परिस्थितीत एच आर मॅनेजरस कडून च्या अपेक्षा या सह विविध महत्वाच्या विषयावर गणेश कोठावळे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मनुष्य बळ विकास महाव्यवस्थापक दयानंद कुलकर्णी यांनी कंपनीतील कामगार व अधिकाऱ्यानं साठीच्या विविध कल्याणकारी योजनानची माहिती देऊन कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रमानचे सादरीकरण केले .कंपनीचे सुरक्षा अधिकारी गंगाधर खाडीकर यांनी कंपनीतील विविध आरोग्य व सुरक्षा विषयक राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.मनोज वाघ यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे डिजिटलायाझेन करण्यात आलेल्या उपक्रमांच्या प्रगतीच्या अलेखाचे नयन मनोहर सादरीकरण केले.
कंपनीत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व कंपनीतील वातावरण आल्हाददायक ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या अद्यावत उपाय योजना व उपक्रमांची माहिती अमित सैनी व राहुल बढे यांनी देताना प्रेक्षकांना आजच्या काळात पर्यावरणाचे महत्व व आपली जबाबदारी या विषयावर उपस्थित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्क्षस्थानावरून बोलताना निपम चे अध्यक्ष प्रकाश बारी यांनी ABB मध्ये कार्यरत असलेल्या बेस्ट प्रॅक्टीसेस चे भरभरून कौतुक केले व इतरांनी ही या बेस्ट प्रॅक्टीसेस अमलात आणाव्यात असे सांगून भविष्यात निपम तर्फे राबविण्यात येणाऱ्या व आत्तापर्यंत झालेल्या उपक्रमांची माहिती दिली. निपम चे माजी अध्यक्ष उदय खरोटे यांचे ही यावेळी मार्गदर्शन झाले या वेळी त्यांनी मनुष्यबळ क्षेत्रातील आव्हाने व हे आव्हाने पेलताना च्या उपाय योजना या वर यथोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे पास्तविक हेमंत राख यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सहस्रबुदधे यांनी केले. आभार पल्लवी पांडे यांनी मानले.या कार्यक्रमास ABB चे व्यवस्थापकीय अधिकारी निपम पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.