स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाच्या पुर्व संध्येला मतिमंद दिव्यांगांच्या घरावर वटवृक्ष कोसळले, शासनाने मदत नाकारली, “दत्तु बोडके यांचे कडुन मदतीचा हात.

*स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाच्या पुर्व संध्येला मतिमंद दिव्यांगांच्या घरावर वटवृक्ष कोसळले, शासनाने मदत नाकारली, “दत्तु बोडके यांचे कडुन मदतीचा हात”* . .*नाशिक जनमत. :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट 22 रोजी संध्याकाळी नाशिक शहरातील नाईकवाडी पुरा जुनेरी दर्गाह परिसरातील सुमारे 200 वर्षांपूर्वी चे वटवृक्ष कोसळुन दिव्यांगांचे घरावर पडल्याने कच्चे पत्र्याचे घर भुईसपाट झाले, शासना कडुन पंचनामा ही झाला, अरबाज आसिफखान या मतिमंद दिव्यांगास मदत व्हावी या साठी मुख्यमंत्री सचिवालय, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचे कडे मदती ची मागणी केली परंतु अतिवृष्टीमुळे वृक्ष कोसळले नसल्याने मदत देता येत नाही असे उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन मिळाल्याने आशेवर असलेल्या दिव्यांग अरबाज हवालदिल झाला सामाजिक कार्यकर्ते बबलु मिर्झा यांनी सदर बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके यांना सांगितले असता 3 महिने पुर्वी दत्तु बोडके व सहका-यानी भेट दिली होती व घरासाठी लागणारे लोखंडी अँंगल आणि पत्रे देण्याचे आश्वासन दिले होते, स्व. गोविंद वाल्मिक बोडके यांचे स्मरणार्थ दत्तु बोडके यांनी ठक्कर बाजार येथील नॅशनल एंटरप्रायजेस कार्यालयात 20,000 (वीस हजार) चा चेक अरबाज यांना दिला, दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांचे मुलभुत अधिकार अबाधित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असताना दिव्यांगांचे घर भुईसपाट झाल्याचे दिसत असतानाही शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय दिव्यांगांप्रती असंवेदनशील असल्याचे दत्तु बोडके यांनी सांगितले, या प्रसंगी नँशनल एंटरप्राईजसचे महेंद्र रोकडे, विजय कापडणिस, रुपेश परदेशी, समाधान बागल, मदन बोधले, विद्या आठवले, बबलु मिर्झा, पुष्पक वाजे ई.
उपस्थित होते.*