साई ञान मंदिर संचालित नाईक विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 99%
साईज्ञान मंदिर संचलित नाईक विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९९% निकाल
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील वसंत नगर येथील श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित व्हि एन नाईक कनिष्ठ महाविद्यालयचा विज्ञान शाखेचा ९९.०१ % आणि कला शाखेचा ९३.२३ % निकाल जाहीर झाला आहे.
या विद्यालयात विज्ञान शाखेत १०२ तर कला शाखेत १३३ विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत होते. त्यापैकी विज्ञान शाखेचे १०१ आणि कला शाखेचे १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती प्राचार्य व्हि. बी. सोनवणे यांनी दिली आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेत कौस्तुभ राजू जाधव ८४.५०, तनुश्री रोहिदास राठोड ८४.३३ आणि कोमल भाऊसाहेब चव्हाण हिने ८३.५० % टक्के गुण मिळविले आहे.
तर कला शाखेत ऋषिकेश दिनेश मोरे ७४.६६ %, नयना देविदास राठोड ७२.६६% आणि करीना राठोड हिने ७२.६६ % टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम तीन क्रमाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळाला आहे.
या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एस. जी. राठोड व सर्व संचालक मंडळाने व पालकांनी तसेच प्राचार्य व्हि. बी. सोनवणे मुख्याध्यापक आर. व्ही जाधव आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विज्ञान व कला शाखेतील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी