मुळाने बारी येथे ट्रॅक्टर अल्टो कार वर पलटी होऊन अपघात 6जणचा मृत्यू. अनेक जखमी.
नाशिक जनमत. नाशिक जिल्ह्यातील वणी जवळील मुळाने बारी येथे आज संध्याकाळी ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉली अल्टो कार वर पलटी झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत अल्टो कार मधील शालक व प्रवाशांना ट्रॅक्टर पलटी होणार असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी अल्टो मधून उद्या घेऊन आपला जीव वाचवला दरम्यान ट्रॅक्टर मधील बसलेले मजूर हे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे अपघात खूपच भीषण होता. ट्रॅक्टरचा ट्रॉली ट्रॅक्टर सहित अल्टो कार वर पडल्या व त्यानंतर खोल दरी मध्ये ही दोन्ही वाहने पडल्याने मजूर लांब लांब फेकले गेले यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी मदत कार्य चालू होते जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे वनी जवळ मार्कंड पर्वताच्या पायथ्याशी मुळाने बारी आहे. ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे वणी येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये जखमींवर उपचार चालू आहेत