नर्मदा परिक्रमा 75 वा दिवस बागलान वासियांचा प्रवास
https://youtu.be/tGFaWYQ2kQ4 जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून सटाणा तालुक्यातील तळवाडे येथील कृष्णा महाराज व त्यांचे सात ते आठ सहकारी नर्मदा परिक्रमा यात्रेसाठी गेले असून यांचा प्रवास आनंदात चालू आहे नर्मदा परिक्रमा म्हणजे विनातक्रार असा हा प्रवास असतो पायी चालत असताना लागणाऱ्या आश्रमामध्ये तसेच रस्त्यात लागणाऱ्या गावांमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली असते तर कधी कधी ही सोय नसते अशावेळी पीठ वगैरे मागून स्वतःच्या हाताने स्वयंपाक करावा लागतो अजूनही जवळपास सव्वा महिना यात्रेस पूर्ण होण्यास लागणार आहे ऊन सावली पाऊस आणि जोरदार थंडी झुके यामध्ये हा प्रवास निरंतर चालू असतो जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर आंतर पायी चालत दररोज न ठकता हा प्रवास केला जातो ह भ प कृष्णाजी महाराज रौंदळ यांनी या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रवासातील काही क्षण आपणा साठी पाठवले आहे ते आम्ही नासिक जम्मत द्वारे आपल्यापर्यंत पोचवत आहोत