वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत सौराष्ट्र वरील विजयात ईश्वरी सावकार ४५.

वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत
सौराष्ट्र वरील विजयात ईश्वरी सावकार ४५
- नासिक जनमत नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या ईश्वरी सावकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करतांना सौराष्ट्र वरील विजयात ४५ धावा करत मोलाचा वाट उचलला.
महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ७ बाद १९६ धावा केल्या. त्यात श्वेता मानेच्या नाबाद ६० धावांच्या पाठोपाठ सलामीला खेळत ईश्वरी सावकारने ४५ धावा केल्या. उत्तरादाखल महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाच्या इशा पाठारे व श्रद्धा पोखरकर या गोलंदाजांनी प्रत्येकी ३ बळी घेत, सौराष्ट्र संघाला २९.५ षटकांत ६८ धावांत सर्वबाद करत १२८ धावांनी मोठा विजय मिळवला.
नवी दिल्ली येथे ४ ते १६ डिसेंबर दरम्यान , बीसीसीआय तर्फे वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत, महाराष्ट्राचे यानंतरचे साखळी सामने, पुढील प्रमाणे होणार आहेत – ८ डिसेंबर – हरयाणा, १० डिसेंबर – उत्तर प्रदेश, १२ डिसेंबर – विदर्भ, १४ डिसेंबर -बिहार, १६ डिसेंबर – पंजाब .
ईश्वरी सावकारच्या ह्या महत्वपूर्ण खेळी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी खास अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आह