ठाणगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील बाल संस्कारांच्या विद्यार्थ्यांनी दिली अगस्ती साखर कारखान्याला भेट
प्रतिनिधी – ठाणगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील बालसंस्कारच्या विद्यार्थ्यांनी अकोले येथील अगस्ती सहकारी कारखान्याला भेट देऊन साखर निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली.
अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी सर्व मुलांना प्रत्यक्षात उसापासून साखर निर्मिती कसे होते हे पूर्ण साखर कारखान्याची यंत्रसामुग्री दाखवून व उसावरील विविध प्रक्रिया समजावून सांगितल्या.
साखर तयार करताना ऊस छाटुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे केले जातात. ऊसाचा रस हा नंतर उकळला जातो. त्यात अन्य रसायने मिसळुन त्याचे ब्लिचिंग केले जाते. त्याच वेळी तपकिरी काळपट मळी एका बाजुला व साखरेचा पाक दुसर्या बाजुला काढला जातो. विशिष्ट आकाराच्या जाळीतुन हा पाक गाळला जातानाच वाळतो व साखरेचे दाणे बनतात. यांत्रिक पद्धतीने लगेच पोती भरुन हवाबंद केली जातात.
साखर निर्मितीची दुसरी बाजू समजावून सांगताना, साखर बनवणे दिसायला सोपे. पण प्रत्यक्षात कटकटीचे आहे. कारण व्यापारी तत्वावर साखर बनवायला लागणारी यंत्रसामग्री फार मोठी असते व त्यासाठी भांडवलही भरपुर लागते. या उद्योगाला लागणारा कच्चा माल त्याच प्रमाणात उपलब्ध असणेही महत्वाचे. म्हणजे कारखान्याच्या क्षेत्रातच उसाची पुरेशी लागवड झालेली असणे आवश्यक ठरते. तसेच येथुन उत्पादन होणारा ऊसाचा पुरवठा एकाचवेळी न होता सलग काही महिने होणेही महत्वाचे राहते.
साखर कारखाना भेटी दरम्यान जयराम शिंदे, ऋतुराज आंबेकर, भगवान शिरसाठ, सोहम बागुल, करण भागवत, रंजना बोऱ्हाडे, वैष्णवी आमले, अनुष्का काकड, संस्कृती व्यवहारे, समृद्धी शिंदे, संस्कृती काकड आदी उपस्थित होते.