आरोग्य व शिक्षण
वाढत्या तपमानामुळे वन्यप्राण्यांना देखील त्रास. उष्णतेच्या सुटके पासून बचाव करण्यासाठी पाण्यात आंघोळ तर बर्फाच्या गोळ्याचा आनंद घेताना माकड.
- नाशिक जनमत . वाढत्या तापमानामुळे पशुपक्षी व वन्य प्राण्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे देशातील अनेक भागांमध्ये सध्या विक्रमी तापमान वाढलेले आहे यामुळे नागरिक देखील
उकाड्याने हैराण झाले आहे अनेक धरणातील पाण्याची पातळी देखील झपाट्याने कमी होत आहे दरम्यान ताप थंडी चे रुग्ण देखील वाढले आहे. दुपारी अकरानंतर रस्ते ओस पडू लागलेले आहे. यातून वन्यप्राणी देखील सुटलेले नाही थंड ठिकाण असलेले महाबळेश्वर येथे देखील तापमान वाढले आहे या ठिकाणी एक माकड बर्फाचा गोळा खाताना दिसत आहे
तर शरीराला गारवा देण्यासाठी काही माकडे घरावर असलेल्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडून मनसोक्त पाण्यामध्ये उड्या मारत असल्याचे दिसत आहे अनेक शहरांमध्ये अनेक चारचाकी व दुचाकी उन्हाच्या तीव्रतेमुळे असल्याच्या घटना देखील घडत आहे. उन्हामुळे दुपारी अकरानंतर शहरांमध्ये संचारबंदी लागू झाल्याचे चित्र काही
शहरांमध्ये आहे प्रामुख्याने नागपूर वर्धा अमरावती जळगाव मालेगाव सांगली इत्यादी शहरांमध्ये तापमानाने चौर्य 40 ते 45 सेल्फी तापमानापर्यंत विक्रमी मजल मारली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक टरबूज खरबूज शीतपेये यांचा आधार घेत आहे पुढील दोन चार दिवस अजूनही तापमान वाढण्याची शक्यता
असल्याचे हवामान खात्याने वर्तवलेले आहे नागरिकांनी गरज असेल तरच उन्हात जावे तसेच मळमळ उलटी जुलाब होत असेल तर डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्यावेत शरीराचं तापमान राखण्यासाठी नेहमी भरपूर पाणी पीत राहावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. नाशिक शहरात देखील तापमान 44 च्या पुढे गेलेले आहे डांबरी रस्ते आणि उंच उंच इमारती यामुळे ग्रामीण भागापेक्षा ही जास्त होऊन नाशिकला देखील लागत असल्याचे नागरिक बोलत आहे थंड हवेचे ठिकाण देखील तापू लागले आहेत यावर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढलेला आहे नाशिक जन्मत काही वन्यप्राण्यांचे फोटो खास आपल्यासाठी दाखवत आहे
.