ब्रेकिंग

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( 23 वर्षांखालील ) नाशिकचा रत्नागिरी वर मोठा विजय

 

 

 

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( 23 वर्षांखालील )

 

नाशिकचा रत्नागिरी वर मोठा विजय

 

मुस्तानसिर कांचवाला नाबाद १४९, प्रथमेश कसबे ५ बळी

नाशिक येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय २३ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), एक दिवसीय सामन्यात , नाशिकने रत्नागिरीवर २३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकचा कर्णधार मुस्तानसिर कांचवाला नाबाद १४९ धावा व प्रथमेश कसबे ५ बळी ही विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले

 

महात्मानगर क्रिकेट मैदानावर नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना नाशिकने ५० षटकांत ९ बाद ३६८ धावा केल्या. कर्णधार मुस्तानसिर कांचवालाने ११९ चेंडूत ७ षटकार व ९ चौकारांसह फटकेबाज नाबाद १४९ धावा केल्या. त्यास शर्विन किसवे ५८, आयुष ठक्कर ३७ व मोहम्मद ट्रंकवाला ३३ यांची साथ मिळली. उत्तरादाखल नाशिकच्या प्रथमेश कसबे ५ बळी व आकाश बोरसे ३ बळी यांच्या भेदक गोलंदाजीने रत्नागिरीला २५.२ षटकांत सर्वबाद १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली. रविंद्र मत्च्या व प्रतीक तिवारीनेहि प्रत्येकी १ बळी घेतला व नाशिकने २३२ धावांनी मोठा विजय मिळवला.

 

इतर दोन सामन्यात मेरी क्रिकेट मैदानावर झोराष्ट्रीयनने जळगाववर २ गडी राखून मात केली तर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर रायगडने पारसी जिमखानावर ५ गडी राखून मात केली. 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे