एस एम बी टी कॉलेज च्या बसला अपघात जीवितहानी नाही.अदाजे 12ते ते 15 जखमी.
नाशिक आज सकाळी सातच्या दरम्यान नाशिक औरंगाबाद महामार्गावर हॉटेल मिरची सिंगल चौफुलीवर ट्रक आणि खासगी बसचा अपघात झाला ही बस एसएमबीटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची असल्याचे सांगण्यात आले आहे धडक जोरदार होती त्यात ट्रकने धडक दिल्यानंतर बस उलटी झाली बस मधील 12ते 15 विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त हाती येत आहे खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी सर्व जखमींना दाखल करण्यात आले आहे सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही सकाळी सात वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे वृत्त आहे अपघातामुळे नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती दरम्यान अनेक नागरिकांनी मदत करत जखमींना रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी मदत केली काही काळ या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अधिक तपास पोलीस करत आहे घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झालेला आहे हे विद्यार्थी शिकाऊ डॉक्टर होते तर शिक्षक स्टॉप याच बस मध्ये होता