मविप्र त्र्यंबक महाविद्यालयातर्फे ५०० देशी वृक्षांचे रोपण*
मिशन ग्रीन ब्रह्मगिरी’ अंतर्गत मेटघर किल्ला व गंगाद्वार येथे वृक्षारोपण उपक्रम* ----------------------------------------------

*मविप्र त्र्यंबक महाविद्यालयातर्फे ५०० देशी वृक्षांचे रोपण*
———————————————-
*‘मिशन ग्रीन ब्रह्मगिरी’ अंतर्गत मेटघर किल्ला व गंगाद्वार येथे वृक्षारोपण उपक्रम*
———————————————-
*त्र्यंबकेश्वर :* मराठा विद्या प्रसारक समाजाच्या त्र्यंबक महाविद्यालयाच्या वतीने ‘मिशन ग्रीन ब्रह्मगिरी’ या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांतर्गत मेटघर किल्ला व गंगाद्वार परिसरात सुमारे ५०० देशी व जंगली वृक्षांचे रोपण करण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वतरांगांचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमास नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अधिकारी शेखर सिंह, अभिनेते चिन्मय उदगीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संपत सकाळे, समाधान बोडके, बहिरू मुळाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले, वनाधिकारी सिद्धेश सावर्डेकर, त्र्यंबकेश्वर वनपाल रवींद्र मौले, सकाळ सत्र प्रमुख डॉ. समाधान गांगुर्डे, डॉ. अजित नगरकर, आयक्यूएसी प्रमुख डॉ. विठ्ठल सोनवणे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. मनोहर जोपळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. दिघे, प्रा. गोतरणे, भूगोल विभागप्रमुख डॉ. संतोष जाधव, प्रा. खाडे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. भगवान महाले, डॉ. भेरे, प्रा. अनिल खेडकर, प्रा. ममता धनगर, दीपक मेढे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण केले. स्थानिक पर्यावरणाला पूरक असलेल्या देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ‘मिशन ग्रीन ब्रह्मगिरी’च्या माध्यमातून ब्रह्मगिरी परिसर अधिक हिरवागार करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असल्याचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले यांनी सांगितले.
—————————————
*त्र्यंबकेश्वर : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या त्र्यंबक महाविद्यालयाच्या वतीने ‘मिशन ग्रीन ब्रह्मगिरी’ या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांतर्गत मेटघर किल्ला व गंगाद्वार परिसरात वृक्षारोपणाप्रसंगी पालकमंत्री ना. गिरीश महाजन, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा अधिकारी शेखर सिंह, अभिनेते चिन्मय उदगीरकर, संपत सकाळे, समाधान बोडके, बहिरू मुळाणे, प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले, वनाधिकारी सिद्धेश सावर्डेकर, त्र्यंवनपाल रवींद्र मौले आदी.* उपस्थित होते
—————————————


