अंबड लिंक रोड झाला मृत्यूचा सापळा दुचाकी घसरून ट्रक खाली सापडल्यान दुचाकी चालकाचा मृत्यू.

दुचाकी घसरून ट्रकखाली सापडल्याने चालकाचा मृत्यू
– सातपूर-अंबड लिंक रोडवर अपघात
प्रतिनिधी नाशिक | जनमत
सातपूर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व रस्ते खोदुन ठेवलेले आहेत. सध्या पावसाळा चालू असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. यावरून अनेक जण घसरून पडतात. काल सातपूर येथील पेंटर हे रस्त्यावरून घसरल्याने आयशर खाली आले. त्यात त्यांचे निधन झाले अतिशय दुर्दैवाची घटना काल आंबड लीक रोडवर घडली. यावेळी नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यावरचा हा दुसरा बळी आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण विकासकामांमुळे पडलेले खड्डे आणि निसरडा रस्ता नागरिकांच्या जिवावर उठला आहे. मंगळवारी (दि. २५) या धोकादायक रस्त्यामुळे दुचाकी घसरून ५२ मृत सुनील बोरसे वर्षीय दुचाकीस्वाराचा ट्रकखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. सुनील बोरसे (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, बोलकर व्हॅली, नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
(कुटुंबांतील कर्ता पुरुष गमावला

सुनील बोरसे हे हेडगेवार चौक (सातपूर कॉलनी) येथे पेंटिंगचे दुकान चालवून ८ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मनमिळाऊ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषच अचानक निघून गेल्याने बोरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.)
एक्सलो पॉईंट ते पपया पर्सरीदरम्यानचा रस्ता ‘निसरडा असल्याने बोरसेंची दुचाकी घसरली. मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बोरसे यांच्यासोबत मागे बसलेले ईश्वर पेंटर हे दूर फेकले गेल्याने बचावले. दरम्यान या घटनेमुळे नाशिक कारण मध्ये संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळावर महापौर आयुक्त यांनी भेट देऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना लवकरात लवकर रस्ता चांगल्या करण्याचे आदेश दिले आहे.


