बळी मंदिर परिसरात पिकप वाहण आणि मोटरसायकल मध्ये अपघात. सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या युवकांचा मृत्यू.

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
▶ नाशिक जनमत नाशिक शहरातील खड्डे मोठ्या प्रमाणात गाजत असून अनेक अपघात होत आहे. आत्तापर्यंत आठ जणांचा खड्ड्यामुळे बळी गेलेला आहे. त्यातच काही वाहण धारक चुकीच्या रस्त्याने वाहन चालवत असल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरात वाहन चालवणे सुरक्षित राहिले नसल्याचे दिसून येत आहे. नांदगाव तालुक्यातील जेऊर येथील युवक नोकरीसाठी बॉस कंपनी नाशिक येथे येतो आणि ड्युटी संपल्यावर घरी जात असताना त्याचा अपघात होऊन गंभीर जखमी होतो अतिशय दुर्देवी अशी घटना उड्डाण पुलावरील बळी मंदिर परिसरात घडले आहे विशेष म्हणजे या युवकाचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. जेऊर या ठिकाणी शोकाकुल परिस्थिती युवकाच्या परिवारामध्ये आहे याबाबत अधिक माहिती
महामार्गावरील बळी महाराज चौक परिसरातील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने उतारावरून भरधाव आलेल्या पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केलेले असतानाही या अपघातात त्याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. २३) दुपारी २ वाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी पिकअपचालकास ताब्यात घेतले आहे.
दीपक गवजीराम चोरमले (वय २७, रा. जेऊर, पो. वाखरी, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक चोरमले हा सातपूरमध्ये राहत होता. तो बॉश कंपनीत कामाला होता. शनिवारी त्याने कंपनीत रात्रपाळी केली होती. तो रविवारी नाशिकच्या दिशेने दुचाकीवरून येत होता. त्यावेळी बळी महाराज चौकातील उड्डाणपुलावरून उतारावर विरुद्ध दिशेने
अंतर वाचवण्यासाठी चुकीचे दिशेने शॉर्टकट
पिकअपचालक जत्रा हॉटेलजवळील रॅम्पवरून उड्डाणपुलावर चढला. त्याला द्वारकेच्या दिशेने जायचे होते. अमृतधाम परिसरात माल पोहोचवायचा असल्याने तसेच सात किलोमीटर अंतर वाचवण्यासाठी तो बळी महाराज चौक परिसरातील विरुद्ध बाजूच्या रॅम्पवरून खाली उतरत होता. त्यावेळी रॅम्पवरून वाहने उड्डाणपुलावर येत होती. त्यामुळे वाहतुकीसाठी जागा नसतानाही पिकअपचालक रॅम्पवरून खाली येत असताना दुचाकी आणि पिकअपची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

आलेल्या पिकअपने (एमएच १२-डब्ल्यू एक्स ९३५४) त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दीपक जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दीपकचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तो दोन वर्षांपूर्वी बॉश कंपनीत कामाला लागला होता.

