कन्नड घाटात बस अपघात. खिडकीतून उड्या मारून 50 प्रवाशांनी वाचवला जीव.
एसटीचा अपघात स्टेरिंग रॉड तुटल्याचे समोर.

प्रतिनिधी खाजगी वाहनातून प्रवासी प्रवास टाळत असले तरी लालपरी एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जात असतो. परंतु आता एसटी बस लाल परि देखील सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. काल कन्नड घाट येथे एसटीचा स्टेरिंगचा रॉड तुटल्याने मोठा अपघात होता वाचला. यावेळेस नागरिक प्रवासी भयभीत झाले होते. वेळ आला होता परंतु काळ आला नव्हता अशी परिस्थिती झाली होती.

– छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या बसचा कन्नड घाटात स्टिअरिंगचा रॉड तुटून पुढील चाक निखळल्याने दरीच्या दिशेने घसरली. बसमध्ये ५० प्रवासी असल्याने क्षणातच प्रवाशांच्या काळजात धडकी भरली. चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावून बस दरीत कोसळण्यापासून रोखली. बस घाटाच्या कडेला लटकलेल्या अवस्थेत थांबल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत चार प्रवासी जखमी झाले.
बस सुरतकडे जाण्यासाठी निघाली. वेरुळजवळ वाहतुकीची कोंडी झाल्याने तेथे बसला एक तास विलंब झाला. दुपारी एक वाजेच्या सुमारास बस कन्नड घाटात आली. जय मल्हार स्पॉटजवळ बसचे स्टिअरिंग ढिले झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याच वेळी स्टिअरिंग रॉड तुटून पुढील चाक निखळले. त्यामुळे बसचा ताबा सुटून ती घाटाच्या कडेला
अपघातामुळे घाटात 3 तास वाहतूक खोळंबली
बसच्या अपघातामुळे घाटातील वाहतूक ३ तास खोळंबली होती. क्रेनच्या साहाएल्याने अपघातग्रस्त बस बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यांत आली. बसचे मागील दोन चाके कठड्याला अडकल्याने बस पाच हजार फुट खोल दरीत जाण्यापासून वाचली.
नियंत्रण मिळवल्याने बस रोखली
घाटातील मल्हार स्पॉटजवळ स्टिअरिंग ढिले झाल्याचे लक्षात येताच बसचा वेग कमी करत ताशी २० किमीवर आणला. परंतु स्टिअरिंग रॉड तुटल्याने बस उतारामुळे दरीकडे घसरू लागली. ब्रेक लावून दरीच्या कठड्यावर बस थांबवली. – सुभाष पल्हाळ, चालक संभाजीनगर
बस क्रेनत्त्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
तपासणी करूनच बस पाठवली
बसची नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री तपासणी करूनच मार्गावर पाठवले होते. कन्नड आगाराचे तांत्रिक कर्मचारी अपघातस्थळी पाठवले होते. अपघाताचा अहवाल आल्यानंतर त्यांमागील कारण स्पष्ट होईल.

