ब्रेकिंग

आदिवासी दुर्गम भागात रस्ते खराब. दवाखान्यात जाण्यास रस्ता नाही महिलेचा मृत्यू.

 

 

 

नाशिक जन्मत    एकीकडे देशांमध्ये विकासाच्या चर्चा होत असताना लोक चंद्रावर राहण्याची तयारी करत असताना आजही महाराष्ट्रात असलेल्या सातपुडा परिसरामध्ये दवाखान्याला जाण्यासाठी  रस्ते नसल्याने एका महिलेला दवाखान्यात देत असताना मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली. मात्र, सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम गावांचा ‘पायाभूत सुविधांचा वनवास’ अद्याप संपलेला नसल्याची संतापजनक वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली.

 

जिल्ह्यातील नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी येथील बारीपाडा गावात रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने एका २३ वर्षीय विवाहितेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. बांबू आणि चादरीची झोळी करून तिला रुग्णालयात नेताना तिची प्राणज्योत मालवली. वेहगीच्या बारीपाडा येथील रुसाबाई सुभाष वळवी यांना शुक्रवारी सायंकाळी अचानक छातीत आणि पोटात वेदना झाल्या. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. मात्र, गावाला जोडणारा पक्का रस्ता नाही, तर उपनदी सुक नदीवर पूल अथवा फरशी नसल्याने रुग्णवाहिका थेट गावापर्यंत पोहोचू

 

नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील घटना

 

शकली नाही. त्यात मोबाइल नेटवर्क नसल्याने रुग्णवाहिकेशी संपर्क साधणेही ग्रामस्थांना शक्य झाले नाही. अखेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या सहाय्याने झोळी तयार केली आणि पिंपळखुंटाच्या दिशेने पायपीट सुरू केली. मात्र, नदीसह दुर्गम वाटेतील अडथळे पार करण्यात वेळ गेला आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच

 

रुसाबाईंची प्राणज्योत मालवली. आमची किंमत नाही का ?

सातपुड्यातील अनेक गावांमध्ये आजही रस्ता, पूल, फरशी किंवा साकव नाही. पावसाळ्यात ही गावे जगापासून तुटतात. ग्रामस्थांना रुग्ण, गर्भवती माता आणि विद्यार्थ्यांसह जीव धोक्यात घालून नदी-नाले ओलांडावे लागतात. निवडणुकीत आश्वासने मिळतात; पण प्रत्यक्षात यातना कायम आहेत. आमच्या जिवाची शासनाला किंमत नाही का?’, असा सवाल ग्रामस्थ दिलीप पाडवी यांनी उपस्थित केला. ‘ महाराष्ट्रातील इतर जनतेप्रमाणे आम्ही देखील भारताचे नागरिक आहोत आम्हाला चांगल्या प्रकारे सुविधा मिळाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे