ब्रेकिंग

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव

*मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव*

नाशिक, दि. १५ ऑगस्ट नाशिक जनमत वृत्तसेवा   : पोलीस दलाच्या वतीने गुणवत्तापूर्ण सेवा आणि कामगिरीसाठी दिले जाणारे अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव आज येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नियोजन भवन सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यावेळी महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी शहर पोलीस विभाग, ग्रामीण पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील गौरविण्यात आलेल्या विविध पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे पुढीलप्रमाणे:

*गुणवत्तापूर्ण पोलिस पदक:*

सहायक पोलिस उप निरीक्षक सर्वश्री शेरखान दिलावरखान पठाण, गुलाब प्रभाकर सोनार, शेखर दशरथ फरताळे,

*अति उत्कृष्ट सेवा पदक*:

पोलिस निरीक्षक अंचल ईश्वर प्रसाद मुदगल, पोलीस उप निरीक्षक सर्वश्री सलिम फकिर माहम्मदकाजी, ज्ञानदेव बारसु राणे, शिवदास अर्जुन कुमावत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री विजय संतु लबडे, काशिनाथ रघुनाथ बागुल, शरद जनार्दन सोनवणे, सुनिल भागाजी बहारवाल, नंदकुमार सुर्यभान नादुर्डीकर, पोलिस हवालदार सर्वश्री प्रदिप चंद्रकांत म्हसदे, प्रविण अशोक वाघमारे, अलीम फकिर मोहम्मद काजी, धनंजय कौतीक शिंदे, संतोष प्रकाश जाधव.

*उत्कृष्ट सेवा पदक*:

पोलीस निरीक्षक सर्वश्री युवराज दिनकर पत्की, जगविंदरसिंग नवलसिंग राजपुत, अंकुश भालचंद्र चिंतामण, अशोक उमाजी शेरमाळे, रणजित पंडित नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत सुभाष तोडकर, पोलिस उप निरीक्षक संदिप रामदास पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मार्तंड श्रीवंत,
सहायक पोलीस उप निरीक्षक कैलास पंढरीनाथ महाले, पोलिस हवालदार सर्वश्री प्रशांत धोंडीराम वालझाडे, नाझीमखान फकिर मोहम्मद पठाण, सचिन अशोक काळे, अविनाश माणिक देवरे, जितेंद्र दिलिपसिंग परदेशी, घणश्याम विक्रम पाटील, मुकुंद माधवराव महाजन, किशोर संभाजी ठाकुर, मनोज पंडीतराव पाटील, गिरीष सुरेश महाले, महेश वसंत साळुंके, सचिन गोपाळ जाधव, दिनेश नथ्थु सोनवणे, विशाल दिनकर काठे, गणेश निवृत्ती फड, चंद्रकांत शिवाजी जगदाळे, संतोष विष्णुपंत उशीर, प्रशांत रामदास मरकड, योगेश विठ्ठल रेवगडे, महिला पोलीस हवालदार माधुरी रामदास मुरकुटे, पोलिस हवालदार सर्वश्री गणेश अशोक कोंडे, विशाल भास्कर देवरे, दिपक विष्णु निकम आणि जनार्दन राघो जाधव

 

 

याशिवाय जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांची नावे पुढीलप्रमाणे:

पोलीस निरीक्षक घनशाम जयवंत बळप, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक नवनाथ त्र्यंबक सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल सर्वश्री रघुनाथ फकिरा पगारे, प्रविण बाळासाहेब काकड,

 

 

जालिंदर उत्तम खराटे, सचिन वामन पिंगळ, सुशांत रामदास मरकड, श्रीकांत सदानंद देशमुख, आनंदा हिरामण गायकवाड, हेमंत सुरेश गिलबिले, योगेश ओमप्रकाश माळवे, मंगेश अशोक गोसावी, शरद पांडुरंग गांगुर्डे,
महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सरस्वती निबा पाटील, करुणा अनिल अहेर, श्रीमती साधना मुरलीधर खैरणार आणि पोलीस नाईक प्रदीप श्रावण बहिरम.

 

 

 

राज्य गुप्त वार्ता विभाग. : अती उत्कृष्ट सेवा पदक सहायक आयुक्त संदीप जीभाऊ मोरे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही यावेळी गौरविण्यात आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:

 

 

 

पोलिस उपअधीक्षक संतोष पैलकर, आणि
अजित त्रिपुटे, पोलिस निरीक्षक राहुल नाईक आणि अजय सूर्यवंशी, सहायक उप निरीक्षक अनिल भालेराव आणि राजेंद्र डांगे, हेड कॉन्स्टेबल सर्वश्री प्रफुल्ल माळी, प्रभाकर गवळी, शरद हेंबाडे, विलास निकम, गणेश निंबाळकर, संदीप हांडगे, संदीप वणवे, प्रमोद चव्हाणके, दिनेश खैरनार, अनिल राठोड, श्रीशैल्य सवळी, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे, नितीन नेटारे आणि जितेश जाधव यांचा समावेश आहेत

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे