ब्रेकिंग

मनपाच्या वतीने स्व.शांताराम (बापू )वावरे जयंती कार्यक्रम*

 

 

*मनपाच्या वतीने स्व.शांताराम (बापू )वावरे जयंती कार्यक्रम*

 

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहराचे प्रथम महापौर स्व.शांताराम (बापू) वावरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन प्रांगणातील पूर्व प्रवेशद्वारा जवळ मनपाचे प्रथम महापौर स्व. शांताराम (बापू) वावरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर विलास शिंदे व व हर्षल कडभाने यांचे शुभ हस्ते व उपायुक्त नितीन नेर यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील महापौर कार्यालयातील प्रथम महापौर स्व. शांताराम (बापू) वावरे प्रतिमेस वावरे परिवारातील सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

या दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमास वावरे परिवारातील सदस्य पुष्पा गायधनी, उज्वला मराठे, विमल पेखळे, युवराज वावरे, सुषमा वावरे,विक्रांत वावरे, नंदा वावरे,राजवर्धन वावरे, मीनाक्षी वावरे, विक्रम वावरे,सिया वावरे, सिद्धांत वावरे,अंकिता वावरे, सुनंदा वावरे, हर्षल कडभाने, श्रीकांत ईशे, उत्तम करपे, महेश सोनवणे आदींसह जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,जनसंपर्क विभागातील मनीषा पाटेकर, श्रीकांत भोई, रमेश पागे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे