नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारताचा ८० व्या स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा.


नाशिक जनमत महानगरपालिकेच्या वतीने भारताचा ८० व्या स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताचा ८० व्या स्वातंत्र्य दिन समारंभा निमित्त महापौर हिमगौरी आहेर आडके यांचे हस्ते व उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनीषा खत्री, प्रभाग सभापती सुरेश पाटील, नगरसेवक राजेंद्र आहेर ,नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत व त्यानंतर राज्य गीत झाले. या वेळी वंदे मातरम,भारत माता की जय अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.त्यात देशभक्तीपर गीते वाजविण्यात येऊन देशभक्तीपर उत्साहाचे वातावरण तयार झालेले होते.

*अग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव*
नाशिक शहरातील म्हसरुळ परिसरात गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत तत्परतेने, धाडसाने व जबाबदारीने कार्य करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रसंगावधान राखून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उल्लेखनीय व कौतुकास्पद केलेल्या कार्याबद्दल पंचवटी अग्निशमन केंद्र येथील केंद्र प्रमूख संजय कानडे, वाहनचालक अशोक सरोदे फायरमन संकेत वैष्णव, प्रथमेश गवळे,सिध्दांत गोतीस, प्रसाद पळसेकर, गणेश रकिबे, प्रणय बनकर यांचा गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

*हर घर तिरंगा अभियान सेल्फी*

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आले होते या सेल्फी पॉईंटवर महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, प्रभाग सभापती सुरेश पाटील, नगरसेवक राजेंद्र आहेर, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या सह अधिकारी कर्मचारी यांनी तिरंगा ध्वजासह सेल्फी काढले.

मनपाच्या वतीने आयोजित या सर्व कार्यक्रमांना अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,नितीन नेर,नितीन पवार, सुवर्णा दखणे, संगीता नांदुरकर,शहर अभियंता संजय अग्रवाल,अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, रवींद्र धारणकर, उद्यान अधिक्षक विवेक भदाने, मुख्य लेखाअधिकारी दत्तात्रय पाथरुट, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे,सिटी लिंक कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार मुंडे, सिटीलींक लेखा अधिकारी सुरेखा जाधव, शिक्षण अधिकारी डॉ.मिता चौधरी, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, बाजीराव माळी, गणेश मैड, आर.एम.शिंदे,सचिन जाधव,अनिल गायकवाड, मिळकत व्यवस्थापक जयवंत राऊत, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधिकारी प्रशांत शेटे, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी,सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे,नगरसचिव संजय नेरकर,स्वीय सचिव दिलीप काठे, विभागीय अधिकारी हेमंत झुटे चंदन घुगे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, क्रीडा अधिकारी मंजुषा पगार,तसेच जनसंपर्क विभागातील मनिषा पाटेकर,साहेबराव भोसले, श्रीकांत भोई,रमेश पागे, मनपातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले.


