ब्रेकिंग

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न*

 

 

*जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न*

 

नाशिक, दि.15 ऑगस्ट, 2026 नाशिक जनमत  वृत्तसेवा):* भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डाॅ. जयकुमार आडे,

 

 

उपविभागीय अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, सीमा अहिरे, शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, रवींद्र भारदे जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तहसिलदार पंकज पवार, प्रदीप कर्पे, अपर तहसीलदार अमोल निकम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी कार्यालयातील व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेच्या नूतनीकरण दालनाचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे