ब्रेकिंग

नाशिक जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत* जिल्हाधिकारी कार्यालय.

*नाशिक जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत*

जिल्हाधिकारी कार्यालय.

 

नाशिक जन्मत   दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास (२२:००:५९ IST) नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) वरील नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी नोंदविण्यात आली असून, मेरी, नाशिक येथून प्राप्त माहितीनुसार तीव्रता ४.१ Mg. इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर होता. प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

तथापि, संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. विशेषतः कच्चे बांधकाम (दगड-मातीचे बांधकाम) असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

 

जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना / आवाहन:

१. जिल्हा प्रशासन व स्थानिक महसूल यंत्रणा संबंधित तालुक्यांशी संपर्क आहेत.

२. नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

३. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, सोशल मीडियावरील (व्हॉट्सॲप, फेसबुक इ.) कोणतीही असत्यापित माहिती किंवा संदेश पुढे प्रसारित करू नये. नागरिकांनी केवळ प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीची व सूचनांचीच नोंद घ्यावी.

४. आवश्यकता भासल्यास नागरिकांनी नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस पाटील, तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे