ब्रेकिंग

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देणारा रस्ता खड्ड्यात. अंबड लिंक रोड ची वाईट अवस्था.

नाशिक जनमत  सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीला व नाशिकच्या विकासाला गती देणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणून अंबड सातपूर लिकरोड ओळखला जातो. सध्या या रस्त्या वर्क काँक्रीट करण्याचे काम चालू आहे एकतर्फे हा रस्ता पूर्ण खोदून टाकलेला आहे. दरम्यान चार दिवसापूर्वी झालेल्या पावसाने या रस्त्यावर दोन दोन फुटाचे व पाच पाच फूट रुंदीचे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. यामुळे रस्त्यावर वाहन चालवणे खूप कठीण होऊन बसलेले आहे.

 

अनेक वाहने नादुरुस्त होत आहे. लहान मोठे अपघात नेहमी या ठिकाणी झालेले आहे. अनेकांनी आपला जीव देखील या ठिकाणी गमावलेला आहे. दरम्यान हा जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे त्यामुळे हा रस्ता अरुंद झालेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती असल्याने कंपनीमध्ये ये जा करण्यासाठी याच रस्त्याचा मुख्य उपयोग होतो मुंबईकडे जाण्यासाठी तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी हाच रस्ता महत्त्वपूर्ण आहे.

औद्योगिक वसाहतीत कच्चामाल आणि पक्का म** आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंटेनर याच रस्त्याने नाशिक च्या औद्योगिक क्षेत्रात येतात पुढील वर्षी कुंभमेळा भरणार असून या रस्त्यावरची ट्राफिक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरम्यान काही महानगरपालिका अधिकारी यांच्या संगमताने या ठिकाणी अतिक्रमण काढले गेले नाही आणि हा रस्ता अरुंद झालेला आहे. या रस्त्यावर प्रवास करणे नेहमी नागरिकांना ट्राफिक जामुळे त्रासदायक ठरते. गेल्या दोन दिवसापासून पाऊस उघडून देखील या रस्त्यावर एका ठिकाणी गुडघाभर पाण्याचा तलाव साचलेला आहे. तसेच मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. होत कामामुळे चिखल रस्त्यावर येऊन त्यावर मोटरसायकल घसरून अपघात होत आहे.

नासिक महानगरपालिकेचे आयुक्त महापौर उपमहापौर यांनी देखील या रस्त्याची पाहनी केले असून कोणत्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांना आश्रय दिला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.

या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजून रस्त्याची कामे युद्ध पातळीवर रात्रंदिवस करणे महत्त्वाचे झाले आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण   करण्याचा दर्जा  चांगला असावा असे व वाहण धारक बोलत आहे.

नेहमी ट्राफिक जाम होत असल्याने संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान व सकाळी सातच्या सात ते नऊच्या दरम्यान या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असावे.

या ठिकाणी नेहमी वाहतूक सुरळीत असावी अशी नागरिकांची मागणी आहे या या भागातील नाशिकच्या विकासाला जोडणाऱ्या या रस्त्याची परिस्थिती चांगली व्हावी नागरिकांना चांगल्या सुविधा मेळाव्यात यासाठी या भागातील नगरसेवक नाशिक महानगरपालिका आयुक्त महापौर उपमहापौर यांच्याशी संपर्क साधून समस्या सोडवण्यासाठी तत्पर दिसत आहे. दोन दिवसाच्या

 

 

 

पावसामध्ये रस्त्याचे पार वाटोळे झालेले आहे. या रस्त्यावर जड वाहतूक होत असल्याने एखादा मोठा अपघात रस्त्यावर होण्याची दाट शक्यता आहे. विकासाचा हा रस्ता खड्ड्यात गेला असून नाशिक महानगरपालिका अधिकारी महापौर आयुक्त उपायुक्त सर्वांनी लक्ष घ**** महत्त्वाचे झाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे