भगवान गडासाठी 31 लाखाची देणगी. चिंचवडगाव येथील एकशे दहा भाविकांची मदत.
नाशिक जनमत महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थ स्थळ भगवान गडाच्या विकासासाठी वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील 110 भाविकांनी सुमारे 31 लाख रुपयांची देणगी भगवान गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्याकडे काल सुपुद केली. राजा हरिश्चंद्र तीर्थ स्थळावरील महाशिवरात्र महोत्सवात महाशिवरात्रि दिवशी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांचे आगमन झाल्यानंतर महाशिवरात्रीच्या सकाळी चिंचवडगाव येथे त्यांची फुलांनी सजविलेल्या रथा मध्ये बसून भव्य मिरवणूक काढण्यात आली गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करीत त्यांच्यावर जयघोष केला मिरवणुकीनंतर भगवानगड च्या विकासासाठी गावातील उपस्थित असलेल्या 110 नागरिकांनी सुमारे 31 लाख रुपयांची वर्गणी केली यावेळी भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडे ती देण्यात आली गावातील अनेक गावकरी सध्या विविध कारणांमुळे परगावी गेलेले आहेत ते आल्यानंतर आणखी वर्गणी जमा होणार आहे सर्व गावकऱ्यांनी या वेळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांचे दर्शन घेऊन गडाच्या विकासासाठी चिंचवडगाव ग्रामस्थ नेहमी तत्पर राहतील अशी यावेळी गवई दिली यावेळी महाराजांनी सर्वांना आशीर्वाद दिले नामदेव महाराज शास्त्री यांच्यासोबत राजा हरिश्चंद्र तीर्थक्षेत्राचे महंत भगवान बाबा राजपूत हे देखील यावेळी उपस्थित होते.