महाराष्ट्र

श्री पिनाकेश्वर महादेवाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक.

श्री पिनाकेश्वर महादेवाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

 

अरुण हिंगमीरे

जातेगाव, नांदगाव

 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्याच्या वन विभागाच्या हद्दीवर असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी मंगळवार दि. १ मार्च रोजी महाशिवरात्रीचे पर्व साधुन सोमवारी रात्री पासुनच भाविकांची रीघ लागली होती. येथील शिवभक्तांनी मंदिराच्या आतुन आकर्षक सजावट करून बाहेरच्या बाजूने रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केली होती.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष हे शिवकालीन पुरातन महादेवाचे मंदिर असून या देवस्थानाचा पवित्र शिवपुरान आणि शिवलीलामृत या ग्रंथांमध्ये उल्लेख अढळून येतो. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते. मात्र शासनाच्या आदेशानुसार देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुन्हा भाविकांना देवाचे दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे ५० हजार पेक्षा अधिक भाविक पिनाकेश्वर चरणी नतमस्तक झाले असल्याचे, ट्रष्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या महादेवाच्या मंदिरानंतर जिल्ह्यातील दुसऱ्या नंबरचे महादेवाचे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री पिनाकेश्वर महादेवाचे देवस्थान असल्याने येथे श्रावण महिन्यात महिनाभर विशेषताः तिसऱ्या सोमवारी त्यानंतर शिवरात्रीला आणि एप्रिल महिन्यात चैत्र वद्य नवमीला भरणाऱ्या वार्षिक यात्रा उत्सवास मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्र त्याच प्रमाणे जिल्ह्यातील शिवभक्त मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येत असतात. या पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिराचा सन १९६० च्या दशकात संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने जीर्णोद्धार करून मंदिराच्या आतील सर्व देवीदेवतांच्या मूर्ती श्रीक्षेत्र काशी येथून आणून प्राणप्रतिष्ठा केली होती त्यानंतर ब्रह्मचारी गंगानंद महाराज यांनी मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम त्याच प्रमाणे गोशाळा, भक्त निवास इत्यादी काम पूर्ण केले होते

बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार, स्वाती गोंड यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय वैद्यकीय अधिकारी पल्लवी साळुंके, आरोग्य सेवक विशाल देवरे आणि अशा कर्मचारी कविता तुपे यांनी येथे येणाऱ्या भाविकांच्या लहान पाच वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओचे डोस दिले.

महाराष्ट्रातील असलेल्या महादेवांच्या मंदिरांपैकी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील मंदिरासमोर आणि जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर सुमारे उंच पुरातन दगडी दिपमाळ अढळून येते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तचर यंत्रणेकडून ठराविक वेळी दिपमाळ प्रज्वलित करून सैन्यदलास इशारा देण्यासाठी असाव्यात असे येथील वयोवृद्ध नागरिक सांगतात. सुमारे २५ वर्षांपूर्वी पावसामुळे मंदिर परिसरातील डोंगरावरील काही माती वाहून गेल्यामुळे गुराख्यांना तेथे शिवकालीन नाणे सापडले असल्याचे सांगण्यात येते.

पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६ वाजेपासुन पोलीस हवालदार सुरेश सांगळे, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बागुल, अभिजीत उगलमुगले, महिला पोलिस मोनाली ठाकरे, अरुणा शिंदे तसेच दंगा नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार घडला नाही

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे