प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार आणणार विकासाची गंगा.
नाशिक जनमत नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी चालू असून सर्वच पक्षांमध्ये प्रचाराला वेग आलेला आहे. प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार श्री दामोदर मानकर श्री प्रमोद पालवे सुनीताताई पिंगळे. इंदुमती भोये (खोसकर ) यांच्या प्रचाराला वेग आला असून नागरिकांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे.

निघणाऱ्या रॅलींना मोठी गर्दी जमत असून अनेक चौका चौकामध्ये चारी उमेदवारांचे स्वागत करून ऑप्शन करण्यात येत आहे. रात्री होणाऱ्या लोकसभेमध्ये प्रभागांमध्ये असलेल्या समस्या बाबत त्या सोडवण्याच्या आश्वासन दिले जात आहे शिवसेना बोलते तेच करते असेही श्री दामोदर अण्णा मानकर व प्रमोद पालवे यांनी मतदारांशी बोलताना सांगितले. मखमलाबाद परिसरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या तसेच पिण्याच्या पाण्याच्या व खड्ड्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या लवकरात लवकर सोडवण्याचे उमेदवार मतदारांना सांगत आहे. प्रभाग क्रमांक सहा मध्ये मोठ्या प्रमाणात नवीन इमारती उभ्या राहत आहे त्यामुळे परिसरातील लोकसंख्या वाढत आहे परंतु गेल्या वीस वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाईन जुन्या व लहान झालेले आहेत त्या पाईपलाईन लवकरच बदलून मोठ्या आकाराच्या टाकल्या जातील त्यासाठी गृहमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रभागाच्या विकासासाठी मोठ्या निधी आणू असे दामोदर मानकर यांनी लोकसभेत सांगितले. नागरिकांना खिशाला परवडेल असे हॉस्पिटल नसल्याने आजारी पडल्यास खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन मोठा खर्च करावा लागतो. नागरिकांना जवळच आरोग्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी परिसरात जवळ महानगरपालिकेचे सरकारी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उमेदवार मतदारांना सांगत आहे

व दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू असे आश्वासने मतदारांना देत आहे. मतदारांनी आम्हाला येणाऱ्या 15 तारखेला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे दिलेला शब्द आम्ही पाळू. प्रभागात विकासाची गंगा आणू असेही उमेदवार प्रमोद पालवे यांनी सांगितले. चारी ही उमेदवार सुशिक्षित असून राजकीय सामाजिक गोष्टीची त्यांना जाणीव आहे प्रभागातील विविध भागातील समस्या त्यांना माहित असून सत्ता नसताना देखील जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. तर दामोदर मानकर यांनी मागे अपक्ष उमेदवारी करत निवडून येऊन नगरसेवक असताना अंदाजे शंभर कोटीचे कामे प्रभागाच्या विकासासाठी केली आहेत असे दामोदर अण्णा

मानकर नाशिक जनमत जवळ बोलताना बोलून दाखवले. आपला प्रभाग हेच आपले घर व परिवार असून प्रभागातील नागरिकांच्या सुख सोयी आरोग्य यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नागरिकांनी रात्री बे रात्री फोन केल्यास त्यांचे फोन उचलून ताबडतोब समस्या सोडू असेही दामोदर मानकर यांनी बोलून दाखवले. एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की यावेळेस आमचे मत विकासला. नागरिकांचा मोठा पाठिंबा सर्व उमेदवारांना मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या पंधरा तारखेला गुलाल नक्कीच प्रभाग क्रमांक सहा चे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उधळतील असे नागरिकांमध्ये चर्चा आहे.



