ब्रेकिंग

आरोग्य विद्यापीठ पुढे अपंग पती-पत्नीच भविष्य निर्वाह निधीचे रकमेसाठी अमर उपोषण.

नाशिक जन्मत    एक वर्ष होऊन देखील आरोग्य विद्यापीठातून निवृत्ती झालेले कर्मचारी देशपांडे व त्यांच्या पत्नी यांना आरोग्य विभागाकडून निवृत्तीवेतन भविष्य निर्वाण निधी रजेचा पगार मिळत नसल्याने आज अमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहे  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून नियत वयोमानानुसार एक वर्षा अगोदर निवृत्त झालेलो आहे. तथापि, विद्यापीठ प्रशासनाने त्यांची वेळोवेळी भेट घेऊन, त्यांना वेळोवेळी पत्र लिहून व त्यांना वेळोवेळी दूरध्वनीने बोलणं करून सुद्धा आज पावेतो

१.माझ्या रजा रोखीकरणाची रक्कम

२.माझ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम ३.तसेच माझ्या वेतनाची अवैध खंड नियमित करून देय असलेल्या अनुषंगिक वेतन निश्चिती नंतरच्या फरकाची रक्कम अदा केलेली नाही.

 त्यामुळे मी प्रचंड तणावात व त्रासात आहे.

मी पन्नास टक्के अपंग असून माझी पत्नी ही साठ टक्के अपंग आहे.

 आमचे कडे उदरनिर्वाहासाठी कुठलेही साधन नाही.

 अशा परिस्थितीत कुठलेही कारण नसताना निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे लाभ रोखून धरणे, एका अपंग कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे लाभ रोखून धरणे हे अन्यायकारक आहे. हा छळ आहे. त्याचप्रमाणे आमची एकुलती एक मुलीच्या उच्च शिक्षणाचा खर्च तसेच तिच्या विवाहाचा खर्च करण्यासाठी आमचे कडे निवृत्तीचे लाभाची रक्कम सोडून दुसरे काहीही नाही. त्या कामी आम्हाला आमचे राहते घर विकावे लागू शकते. सबब, आपण विद्यापीठ प्रशासनास आदेशित करावे की, सदर अपंग कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची लाभाच्या सर्व रक्कम यथा शीघ्र त्यांचे बँकेच्या खात्यात जमा करावी. अशी मागणी त्यांनी आरोग्य विद्यापीठाकडे व प्रशासनाकडे केलेले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे