बॉईज टाऊन विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ संपन्न
बॉईज टाऊन विद्यालयात इ..10 वीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निरोप समारंभ संपन्न….
‘ नशिक जनमत शाळा सुटली पाटी फुटली……..’ म्हणता म्हणता दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षाही पार पडली.विद्यार्थ्यांच्या मनांत महाविद्यालयात प्रवेश घेण्याविषयीचं कुतूहल आणि आपल्या शाळेचे सुरक्षाकवच सोडून जाण्याची संमिश्र भावना लक्षात घेऊन बॉईज टाऊन विद्यालयात दि.4 फेब्रुवारी,2022 रोजी इ.10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निरोप समारंभ आयोजित केला होता.
ह्या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी सद्यस्क स्पर्धाही आयोजित केल्या गेल्या. त्यामध्ये विशेषत: रॅम्प वॉक,केशभूषा,नृत्य तसेच बॉईज टाऊन प्रिन्स व प्रिन्सेस ही निवडण्यात आले. तसेच वर्ष 2021-22 मधील सुप्रतिष्ठित, विविध योग्यता धारण करणा-या, खास इ.10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली पारितोषिकेही जाहीर करण्यात आली.निवडक विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपापल्या मनोगतातून शाळेविषयीची आत्मीयता व कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
- बॉईज टाऊन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांनी चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले व शालांत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. एकूणच शाळेने आजपर्यंत दिलेले आचारविचार, केलेले संस्कार, जीवनाला सामोरे जाण्याची प्रेरणा व क्षमता अशी समृद्ध शिदोरी घेऊन जाताना विद्यार्थी अत्यंत भावूक झाले होते.