ब्रेकिंग
आजी आजोबा फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिकां साठी चित्रकला स्पर्धा कार्यक्रम संपन्न
दिनांक २६/१/२०२२ रोजी आजी-आजोबा आधार फाऊंडेशन तर्फे वृद्धांसाठी एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ती म्हणजे चित्रकला स्पर्धा त्यात अंबड सातपुर लिंक रोड जाधव संकुल सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले होते त्यात ७०ते८४ वयाच्या वृध्दानी वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढून सर्वाची मने जिंकली
कार्यक्रमाचे आयोजन हे आजी आजोबा आधार फाऊंडेशनचे फाऊंडेशन अध्यक्ष व सस्थापक श्री संजय शिलेलान आणि (नगर सेवक )मधुकर शेठ जाधव यांनी केले होते व भिका भाऊ सोनवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले कार्यक्रमाला गणेश पानसरे, गणेश सूर्यवंशी, सुनील शिलेलान, मोहन चव्हाण, शरद निंबाळकर, शेवकर भाऊ, दीपक शिलेलान, व रहिवाशी उपस्थित होत. कार्यक्रमात कोरोना सर्व नियमांचे पालन करण्यात आली होती.