नांदगाव सेना पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या महाप्रबंधक यांना दिले समस्यांचे निवेदन
आमदार कांदे यांच्या सूचनेनुसार नांदगाव सेना पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या महाप्रबंधकांना विविध समस्यांचे निवेदन
नाशिक जनमत अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
आज शुक्रवार दि.२८ रोजी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक हे नांदगाव येथे नवीन पदाचारी पूल व तिकिट बुकिंग ऑफिसचे उदघाट्न प्रसंगी आले असता त्यांना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार नांदगाव सेना पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेऊन
विविध समस्यांचे निवेदन
या मध्ये
नांदगाव शहरातील रेल्वेगेट बंद केल्यानंतर अंडर बायपास मुळे आज ही गेट बाहेरील नागरिक मोठ्या संकटांना समोरे जात आहे, अंडर पास मध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचते, पायी जाणाऱ्यांना पर्यायी रस्ता नाही यावर त्वरित तोडगा काढवा. तसेच नांदगाव रेल्वे स्थानका वर सर्व गाड्यांना पूर्ववत थांबा मिळावा.
मनमाड, मालेगांव, नांदगाव, येवला, कोपरगांव, लासलगांव, निफाड, चांदवड व पिंपळगांव (ब.) येथून प्रवास करणारे नियमित सर्व चाकरमाने वर्षानुवर्षे मनमाडहुन मुंबईकडे सुटणारी गोदावरी एक्स्प्रेसने कामासाठी/उदरनिर्वाह करण्यासाठी नियमित ये जा करत असतो.रेल्वे प्रशासनाने सर्व गाड्या प्रवाशासाठी शासनाच्या SOP नुसार रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशाला प्रवास करता येईल अशी अट घालुन सदर गाडी सुरु केली. मात्र या मुळे नियमित ये-जा करणारे चाकरमाने, सर्व साधारण प्रवाशी यांची आज पर्यंत अतोनात अशी हाल हात आहे. व नियमित प्रवास करणाऱ्यांना गैरसोयीचे होत आहे.
पंचवटी बरोबरच, गोदावरी एक्स्प्रेस सुरु करण्याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेने वेळोवेळी विनंती अर्ज, निवेदने, मागणीचे पत्र रेल्वे प्रशासन तसेच जन प्रतिनिधी (एम.पी., एम.एल.ए.) यांना लेखी व प्रत्यक्ष भेटुन दिलेले आहे. मागणी केल्यानुसार पंचवटी एक्स्प्रेस सुरु करुन तीला एम एस टी वापराची परवानगी देखील देण्यात आली आहे. परंतु पंचवटी ही ज्या वेळेत सुरु आहे त्या वेळेत तिचा उपयोग सर्व सामान्य जनतेला हवा तसा होत नाही. त्यामुळे त्याच धरतीवर गोदावरी एक्स्प्रेस सुरु करण्यात येऊन मासिक पास धारकांना परवानगी देण्यात यावी, जेणे करून विद्यार्थी आणि चाकरमानी यांनी सोयीचे होईल.
तसेच गोदावरीला एक स्वतंत्र टि.सी. व आर.पी.एफ. तसेच मनमाड स्टेशनसाठी मासिक पास खिडकी सुरु करण्याबाबत देखील अनेकदा मागणी केली आहे. आजतायगत संबंधीत रेल्व प्रशासन, लोप्रतिनिधि यांच्याकडुन कुठल्याही प्रकारचा होकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने गैरसोय होत आहे त्यामुळे प्रवाशी व ये-जा करणारे चाकरमान्यांना तिव्र आंदोलन छेडल्याशिवाय अन्य दुसरा पर्याय राहणार नाही. नांदगाव, मालेगांव, येवला आणि कोपरगांव तालुक्यातून कमीत कमी ६००० प्रवासी अप डाऊन करतात त्यामुळे सगळ्या तालुक्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सगळे लोक रस्त्यावर उतरतील आणि त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील ह्याची नोंद घ्यावी.
नवीन वेळापत्रक लागु होत आहे त्यानुसार अद्यापही गोदावरी एक्स्प्रेस अजून ही चालु झालेली नाही, तरी रेल्वे प्रशासनाने सर्व सामान्य प्रवाशी, व्यापारी, विद्यार्थी, चाकरमानी यांची जीवनवाहिनी म्हणून समजली जाणारी गोदावरी एक्स्प्रेस लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. ऑफिस कामाच्या वेळेत तसेच इतरही सर्व कामाच्या वेळेत धावणारी गाडी असुन ती बंद असल्याने खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तरी आपण या निवेदनाचा गांभिर्यपूर्वक विचार करून चाकरमान्यासाठी सुरु असलेली परंतु २२ मार्च २०२० पासून बंद असलेली गोदावरी, इगतपूरी मनमाड शटल या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात यावी, असे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, अमोल नावंदर, सुनील जाधव,भाऊरावं बागुल,भय्यासाहेब पगार, गुलाब भाबड हे उपस्थित होते.