महाराष्ट्र

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला तालुक्यातील बल्हेगाव विद्युत केंद्राची मंजुरी

*पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून;येवला तालूक्यातील बल्हेगाव विद्युत उपकेंद्रास मंजुरी*

 

 

*नाशिक,येवला,दि.८ मार्च :-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून शासनाचे कृषी धोरण २०२० अंतर्गत येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रास तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. या उपकेंद्रासाठी ३ कोटी १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरित करण्यात येऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

 

येवला तालुक्यातील बल्हेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी याठिकाणी कृषी धोरण या योजनेतून ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र प्रस्तावित होते. सदर उपकेंद्राचा प्रस्ताव कृषी धोरण २०२० योजने अंतर्गत महावितरण विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करून बल्हेगाव येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रास तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. बल्हेगाव उपकेंद्रास तांत्रिक मान्यता मिळाल्याने आता लवकरच या उपकेंद्राच्या जागेची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या उपेकेंद्रासाठी ३ कोटी १० लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून लवकरच या उपकेंद्राच्या कामाला सुरवात होणार आहे.

 

 

येवला मतदारसंघातील विजेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित नुकतीच आढावा बैठक पार पडली होती. सदर बैठकीत येवला मतदारसंघातील विजेचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. यामध्ये बल्हेगाव येथील विद्युत उपकेंद्राचे प्रलंबित काम मार्गी लावण्याच्या सूचना देखील दिलेल्या होत्या. त्यानुसार कृषी धोरण २०२२ योजनेअंतर्गत या विद्युत उपकेंद्रास ३ कोटी १० लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित करून तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. या विद्युत उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना सुरळीतपणे विद्युत पुरवठा होणार असून शेतीसाठी अधिक फायदा होणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे