साहित्यरत्न लोकशाहीर पुतळ्याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात सकल मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन..

नाशिक : प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर पुतळ्याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात सकल मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
जाणीवपूर्वक विलंब करून पुतळ्याबाबत चालढकल करणाऱ्या मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मनपा प्रशासनाचा निषेध असो, वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासनाचे करायचे काय! खाली डोके वरती पाय, धिक्कार असो, धिकार मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यानंतर जिल्हाधिकारी यांचे नावे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वाघ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा एक वर्षापासून धुळे येथे तयार असलेला नवीन पुतळा फक्त
मनपाकडून तातडीने होत नसलेल्या पाठपुराव्याअभावी पडून असल्याचे नमूद केले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून नवीन पुतळा बसवावा याविषयी समाजाच्या भावना खूप तीव्र असल्याचे कळविले आहे.
यावेळी सकल मातंग समाजाचे बाळासाहेब शिरसाठ, अशोक साठे, गोपाळ बस्ते, संतोष शेळके,
भारत जाधव, ज्ञानेश्वर काळे, सूर्यकांत भालेराव, रमेश कांबळे, पोपट वाघ, बबन गायकवाड, अमोल आल्हाट, सूर्यभान साठे, दिलीप साठे, रवींद्र बोराडे, दिलीप बंदरे, कृष्णा बलसाने, भारत वाघमारे, किरण जाधव, नाना उल्हारे आदींसह विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.