ब्रेकिंग

जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी, नाशिक येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करून जनजागृती अभियानास प्रारंभ*

*जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी, नाशिक येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करून जनजागृती अभियानास प्रारंभ*

नाशिक – विद्यार्थी व युवक यांच्या माध्यमातून ग्राहकांची होणाऱ्या कसवणुकीबाबत जनजागृती अतिशय जलद गतीने होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश मिलिंद सोनवणे यांनी केले.

जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी या ठिकाणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग व ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक महानगर यांच्या संयुक्त वतीने ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमाप्रसंगी सोनवणे बोलत होते. ग्राहक जनजागृती अभियानची माहिती देऊन ग्राहकांनी काही तक्रार असल्यास ग्राहक आयोगाकडे तक्रार करावी. असे आवाहन केले.
यावेळी नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, ग्राहक आयोग सदस्य सौ कुलकर्णी, श्री. सचिन शिंपी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे नाशिक विभाग सहसंघटक अँड. सुरेंद्र सोनवणे, अँड. कोणिका टिले- जाधव, नाशिक महानगर संघटक प्रशांत देशमुख, सचिव अँड. राजेंद्र शेवाळे, सहसंघटक प्रमिला पाटील, विजय शेवाळे, ग्राहक मंचचे प्रबंधक विरार, प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे, डीएड कॉलेजच्या प्राचार्या एम. जे. थेटे, पर्यवेक्षिका एन. पी. चौधरी व कॉलेज विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजवलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य रमेश वडजे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्वांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी सचिन शिंपी यांनी संरक्षण कायदा व विद्यार्थी भूमिका व कुलकर्णी यांनी कोर्ट केसेससंबंधी माहिती दिली. प्रास्तविक अॅड. कोणिका टिळे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. सुरेंद्र सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे, पर्यवेक्षक एन. पी. चौधरी यांनी प्रयत्न केले. यावेळी  कर्मचारी वर्ग व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी  उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे