श्यामची आई आजच्या काळात ही संस्कारांचे महाकाव्य आहे – डॉ संदीप भानोसे
श्यामची आई आजच्या काळात ही संस्कारांचे महाकाव्य आहे – डॉ संदीप भानोसे
पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपले साने गुरुजी यांची 125 जयंती सर्वत्र जोशात साजरी हो आहे .लहानपणी मुलांवर संस्कार करायचे तर आजही श्यामची आई हे मार्गदर्शक ठरते.
दूरदृष्टी, संवेदनशीलता ,उत्तम लेखन, संवाद कौशल्य ,विचारांवर पकड, प्रामाणिकपणा ,संघटन बांधणी ,वात्सल्य ,सृजनशीलता व इतर गुण गुरुजींच्या व्यक्तिमत्वामध्ये सदर गुण प्रकर्षाने पाहिला मिळतात असे गौरव उद्गार डॉक्टर संदीप भानोसे यांनी केले.
महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना विद्यालय प्राथमिक मध्ये पूज्य साने गुरुजी 125 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी माननीय श्री संदीप भानोसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री निलेश ठाकूर संस्था प्रतिनिधी, मुख्याध्यापिका सौ निशा बर्वे, ज्येष्ठ शिक्षिका सौ शैलजा निकम यांनी पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी श्यामची आई नाटिकातील प्रसंग सादर केला. इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी सर्वधर्मसमभाव वर आधारित नाट्यकरण केले. दर्शना चव्हाण यांनी साने गुरुजींचा जीवन परिचय करून दिला. जयंतीनिमित्त ट्रे गार्डन आणि पोस्टर मेकिंग प्रदर्शन मांडण्यात आले. प्रमुख अतिथी श्री संदीप भानोसे यांनी आपल्या परिचयामधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेखा बागुल यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक सौ मनीषा येवला यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रीमती स्वाती एडके यांनी केला. कार्यक्रमाचे आभार श्री भगवंत गावंडे यांनी केले.
पूज्य साने गुरुजी 125 वी जयंती निमित्त आनंद सप्ताह अंतर्गत आठवडाभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आनंद सप्ताह मध्ये चित्रकला स्पर्धा, कथाकथन, पारंपारिक खेळ, बाहुली बनवणे, फुलांचा गालिचा, ट्रे गार्डन, सर्व धर्म समभाव वेशभूषा आणि पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.