नायलॉन मांजा वापरणाऱ्या वर होणार ताडीपारीची कारवाई.
नाशिक जनमत. नाशिक शहरात नायलॉन माज्या विक्री तसेच साटेबाज व वापर करताना आढळून आल्यास आता थेट तरीपरीची कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे .या संदर्भात अधिसूचना काढले आहे . आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शिवाय पोलीस ठाणे अंतर्गत विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. पोलिसांनी काढलेल्या आदेशात शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आलेले आहे. सोबतच नायलॉन मांजाचा वापर जे करतात त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहे .मकर संक्रांतीनिमित्त नायलॉन मांजाचा सरास वापर होतो. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी होतात..चार दिवसांपूर्वी सिन्नर येथे एका वृद्ध व्यक्तीच्या मानेमध्य नायलॉन मांजा अडकल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यास 32 टाके देण्यात आले. त्याचा जीव थोडक्यात वाचाला. मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी देखील जखमी होतात. तसेच दोरा
अडकल्यामुळे वीज प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत होतो. दरम्यान नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही बाब लक्षात घेऊन मनाई ही आदेश काढले आहे . आयुक्तालयच्या हद्दीमध्ये नायलॉन मांजा. काचेची कोटिंग मांजा. निर्मिती विक्री आणि वापर करणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे .या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येऊन थेट तडीपारची कारवाई करण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी जनजागृती देखील करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक वर्षी अनेक पक्षी व नागरिकांना आपले प्राण देखील जमावे लागतात अनेक जण जखमी देखील होत असतात.
तर पतंग उडवताना अनेक जण टेरेस गच्चीवरून पडून जखमी होतात. या कारवाईचे नागरिकांमध्ये स्वागत केल्या जात आहे.