पेठ रोड वरील उमराळे परिसरात कंटेनर व दुचाकीचा अपघात . दुचाकी स्वराचा अपघातात मृत्यू.
नाशिक जनमत. पेठ रोडवरील उंबराळे परिसरामध्ये काल दुर्दैवी अशी घटना घडली. कंटेनर व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालेला आहे. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये कंटेनर चालका
विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. चाळीसगाव तालुक्यातील अंधारी येथील व सध्या नाशिक येथे मधुबन कॉलनी दिपाली f सोसायटीतील नामदेव दत्तू नागरे वय 51 हे कामानिमित्त उमराळे येथे गेले होते. येथून ते वापस मोटरसायकल क्रमांक एम एच 15 fs 63 34 या दुजाकीने नाशिककडे निघाले होते. दरम्यान समोरून येणाऱ्या कंटेनर टी88 एन v 8388 . या क्रमांकाच्या कंटेनर ने समोरून त्यांना धडक दिली यामध्ये त्यांच्या डोक्यात हातापायास छातीस मार लागून जागेवरच मृत्युमुखी पडले.
घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दिंडोरी पोलिसांना ही माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून कंटेनर चालक या ताब्यात घेतले आहे. दुचाकी स्वार नामदेव नथू नागरे. यांच्या पक्षात एक मुलगा एक मुलगी पत्नी असा परिवार आहे. अतिशय कष्टाळू व मेहनती सर्वांशी प्रेमाने वागणारा असे हे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाची बातमी मधुबन कॉलनी परिसरातील नागरिकांना व नातेवाईकांना समजल्याने सर्वजण शोक मग्न झाले. दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे पोस्टमार्टम करून त्यांच्यावर नाशिक येथील पंचवटी अमरधाम येथे रात्री अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पेठ रोडवरील नाशिक ते पेठ रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर बसवणे
महत्त्वाचे झाले आहे. रस्त्यावर डिव्हायडर नसल्याने वाहतूक मोठी असल्याने या रस्त्यावर अपघात नेहमीचे घडत आहे. गुजरात राज्याला जोडणारा हा रस्ता असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे बांधकाम विभागांनी ताबडतोब डिव्हायडर बसून होणाऱ्या अपघात थांबावेत अशी वाहनधरकांची मागणी आहे.